प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशक्ति वर्धन – मी ६० वर्षच असून शारीर समागम साथी स्वस्थ कसे करावे ?

मी ६० वर्षच असून शारीर समागम साथी स्वस्थ कसे करावे ?…शीघ्र पतन  या वर उपाय संगा .

1 उत्तर

उत्तर देण्यात झालेल्या विलंबाबद्दल सर्व प्रथम क्षमस्व. तुमचा प्रश्न चांगला आहे. मी असं म्हणेन कि आपण सर्वांनी मुळातच स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण असायला हवं. शरीर समागमात सामिल व्यक्तींची शारीरिक आणि मानसिक स्थिती योग्य असेल तर लैंगिक आरोग्य सुद्धा चांगले राहील. वाढत्या वयानुसार लैंगिक इच्छा, लिंगाची ताठरता, पुरुष बीज निर्मिती, मांस पेशींची ताकद, उर्जा ई अनेक गोष्टीं बदलतात. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेप्रकाचे प्रमाणही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजना कमी होत जाते आणि हे स्वाभाविक आहे. त्यातही शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीत शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम उपयोगी पडू शकतो. चांगला आहार, व्यायाम आणि चिंतामुक्त जीवनशैली शरीर आणि मन स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
आता शीघ्रपतना विषयी. याला आपण वीर्य लवकर बाहेर येणे असं म्हणूयात थोडा वेळ. शीघ्रपतनाचा अनुभव कोणत्याही वयात येऊ शकतो आणि आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे. बरेचदा त्यामुळे ती व्यक्ती अथवा त्या व्यक्तीचा जोडीदार यांना कामपुर्ती आथवा लैंगिक समाधान मिळण्यात अडथळा वाटतो आणि त्यातून निराशा येते. शीघ्रपतनाची समस्या दूर होऊ शकते.
अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation/. लेखातील माहितीचा नक्की उपयोग होईल.
इथे दोन गोष्टी आपण ध्यानात घेऊयात. संभोग किती वेळ चालतो यापेक्षाही संभोगातून दोन्ही जोडीदारांना आनंद मिळतोय का नाही, दोघांना सुख मिळतंय का नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय लैंगिक आनंद फक्त लिंगप्रवेशी शरीर संबंधातूनच मिळतो असे नाही तर त्यासाठी इतर अनेक पद्धती आहेत ज्यात एक किंवा अनेक व्यक्ती त्या एकत्र करू शकतात. त्या शोधायला हव्यात असं वाटतं.
नोट – बाजारात अनेक फसवे दावे करणारी औषधं किंवा गोळ्या उपलब्ध असतात त्या घेण्याअगोदर   एखाद्या सेक्सोलोजिस्टचा सल्ला मात्र अवश्य घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 18 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी