शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

शीघ्रपतन म्हणजे नक्की काय?

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.

शीघ्रपतन का होतं?

तरूणपणी जेव्हा लैंगिक संबंधांचा अनुभव नसतो तेव्हा आपल्याला ‘सगळं’ जमेल ना या चिंतेमुळे शीघ्रपतन होऊ शकतं. काही काळाने यावर ताबा येतो. यासोबत इतरही कारणांमुळे ही समस्या निर्माण होते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

यावर उपाय काय?

सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

https://letstalksexuality.comearly-ejaculation-start-stop/

 

40 Responses

  1. BALIRAM REVANSIDDHA JETHE says:

    समाधान वाटले

  2. पहिल्यादा सेक्स करत होतो 6 ते 7 वर्ष सेक्स केले आहे आत सेक्स करत असताना लिंग कमी ताठ होतो त्या वर काय उपाय

    • Satyjeeth patil says:

      माझे लिंग ताट होत नाही आणि धातु कमी प्रमाणात होतो सेक्स करताना मन करायला होत नाही यावर उपाय ❓

  3. Siddhesh says:

    माझं वय 24 आहे सतत हस्थमैथुन करून लिंग लहान आणि खूप नरम झालय।।सेक्स करताना लगेच वीर्य बाहेर येते काय करू

  4. Sandeep says:

    माझे लघवी करताना विर्य जाते आणि आता ताठरता पण येत नाही काय करावे कुठलि आषध आहे का

  5. Vikas says:

    शीघ्रपतन समस्या आहे इच्छा कमी झालीय ताठरता खूपच कमी आहे

  6. माझं वय 28 आहे, पहिल्यादा सेक्स करत होतो. 3 वर्ष सेक्स केले आहे. आता सेक्स करत असताना लिंग कमी ताठ होते, त्यावर काय उपाय आहे का? सतत हस्तमैथुन करून लिंग लहान आणि खूप नरम झालंंय, सेक्स करताना लगेच वीर्य बाहेर येते काय करू?

  7. Rajat says:

    सेक्स करत असताना माझा 2 मिनिटात वीय पडतो या वर काही उपाय आहे का

  8. Vikas tathe says:

    विर्य गळाल्यावर माझं लिंग ताबडतोब नरम होत

  9. Rahul says:

    Medical mde je sex power chya medicine miltat. Tyacha khi side effects hoto ka

  10. Janardan raut says:

    माझ वीर्य लवकर बाहेर येते. उपाय सांगा

  11. Adesh says:

    Sir maza pahila veles virya lagech baher padto Tyachyananantar mala ek tasa nantar echya hote pan lavkar lingala tatharta yet nahi tyachya sathi kay upay aahe sanga plz

  12. कोमल says:

    मी एक महीला आहे
    आणि मला सेक्स करतांना किती पण वेळ सेक्स केला तरी वीर्य पात होत नाही समाधान होत नाही

  13. कोमल says:

    सेक्स केल्या
    नतर जे सुख कीवा समाधान मिळते ते मला मिळत नाही मी गरोदर होते त्या वेळी माझी पिशवी धुतली होती त्यामुळे माझी ती जागा मोठी झाली आहे
    त्यामुळे पुरुषांचा सेक्स केल्या नंतर जसे वीर्य पात होता तसा स्री चा पण होतो ना पण माझ्या बाबतीत तसं नाही
    मला सेक्स केल्या नंतर समाधान होत नाही
    या वर काही उपाय आहे का

  14. Mahesh says:

    सर मझ लिंग बारीक़ आहे जाड़ होण्यासाठी काही उपाय सांगा

  15. nandu says:

    सर माझ्या लिंगाची साइज बारीक़ व् लिंगच्या खालील बाजुची साइज खुप लहान आहे टी वाढवण्याची उपाय सांगावे

  16. Nitin says:

    मला अं डकोश ला चेंडू लागला होता त्या नंतर माझ्या लिंगाला कधी कधी ता ट रता येते. व कधी कधी येत नाही आसे का होते

  17. G says:

    सर माझे लिंग उठत नहि। सेक्स करायची इच्छा पन होते नहि काय करावे मी अगोधर हस्तमैथुन करायचो आता लगन झाला आहे पन सेक्स करायची इच्छा नहि होत

  18. गणेश थोरात says:

    Sir माझे वीर्य लवकर गळत नाही सुरुवातीला ते लवकर बाहेर येत होतं पण आता खुप वेळ लागतो काय करावं हे कळत नाही खुप त्रास होतो

  19. Sam says:

    माझी परिस्थिती अशी आहे की २० ते २५ मिनिट वीर्य पडत नाही आणि पार्टनर एवढा वेळ करू देत नाही हे लिंग लांब आणि जाड असल्यामुळे होते की वीर्य लवकर पडत नाही म्हणून? की पार्टनर ची काही अडचण?

  20. Shekhar Ji says:

    संभोगा दरम्यान माझे शिश्न सैल पडते आणि त्यामुळे योनीमध्ये प्रवेश करणं अशक्य होतं. पण इतर वेळी म्हणजेच जेव्हा संभोग करण्याची वेळ नसते तेव्हा मात्र माझे शिश्न ताठ आणि कठोर असते. हे असं का होत आहे यामागील कारण मला जाणून घ्यायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap