शीघ्रपतन

731
XXXX asked 4 years ago

मला 14 व्या वर्षापासून आत्तापर्यंत मुट्ठ्या मरायची सवय होती पण फ़क्त मुठ्या मारत असतांनाच् माझ् शीघ्रपतन होत अजुन तर कुनासोबत सेक्स पण केलेला नाहीये काहीतरी उपाय सांगा

1 Answers
let's talk sexuality answered 4 years ago

हस्तमैथुन आणि शीघ्रपतन याचा काहीही संबंध नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते. याविषयी सविस्तर माहितीसाठी  पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा.
https://letstalksexuality.com/premature-ejaculation/