1 उत्तर
साधारतः स्त्रीबीज हे पाळीच्या चक्राच्या मध्यावर परिपक्व होते. उदा. २८ दिवसांचे चक्र असेल तर १४ व्या दिवशी स्त्रीबीज परिपक्व होते. पण त्याची पूर्णपणे खात्री देता येऊ शकत नाही कारण काही विशिष्ट परिस्थितीत संप्रेरक असमतोल (Hormonal imbalnce) होऊन स्त्रीबीज वेळेच्या आधीच परिपक्व होऊ शकतं. स्त्रीबीज परिपक्व होण्याचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. त्यामुळे जर खात्रीशीरपणे आपल्याला गर्भधारणा नको असेल तर गर्भनिरोधक वापरणं अत्यंत आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा