प्रश्नोत्तरेएकाच मुलीला सारख सारख संक्रमण केल्यावर एडस होतो का?

1 उत्तर

तुम्हाला कदाचित एकाच मुलीसोबत (जोडीदारासोबत) संभोग किंवा सेक्स केल्यावर एच. आय. व्ही. होतो का असे म्हणायचे असावे. लैंगिक संबंध आणि लैंगिकतेबद्दल बोलताना आपणाला योग्य शब्द माहित नसतात किंवा कधीकधी ते वापरताना आपणाला संकोच वाटतो. मात्र, याविषयी मोकळेपणाने संवाद साधायचा असेल तर योग्य ते शब्द वापरणे आवश्यक आहे. असो. आता वळूयात तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. एच. आय. व्ही. असणाऱ्या व्यक्तीसोबत असुरक्षित संभोग(सेक्स) हे  एच. आय. व्ही.  होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. मात्र , जोडीदाराला जर एड्स नसेल तर नियमित संभोग केल्याने एच. आय. व्ही संसर्ग होण्याची शक्यता अजिबात नाही. एच. आय. व्ही. दुषित रक्त, शिरेद्वारे मादक द्रव्ये घेताना एच. आय. व्ही. दुषित सुईचा वापर यांसारख्या एच. आय. व्ही. संसर्ग होणाऱ्या इतर मध्यामंतून मात्र एच.आय.व्ही होऊ शकतो.
 एच. आय. व्ही. विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.

एच आय व्ही – एड्स


 
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 2 =