प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्लफ्रेँड आनी बाँयफ्रेँड मध्ये सेक्स झाल्यास विर्य योनिमध्ये न पडु देता बाहेर पाडले असता गर्भधारना होनार की नाही होनार सेक्स केल्यानंतर कीती मिनिटांनी पुन्हा सेक्स करावा

1 उत्तर

संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर पाडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने  म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील  असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे. गर्भ निरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.
आता तुमचा दुसरा प्रश्न. सेक्स केल्यानंतर पुन्हा किती वेळाने दुसरा सेक्स करावा याचे नेमके उत्तर नाही. हे सेक्स किंवा संभोग करणाऱ्या व्यक्तींनी ठरवण्याची बाब आहे. मात्र, दोन्ही जोडीदारांची इच्छा मात्र महत्वाची.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 17 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी