प्रश्नोत्तरेज्या वेशा व्यवसाय करणार्या स्त्रीला HIV (एडस)झालेला नाही त्या स्त्री बरोबर बिना कंडोम (कंडोम न लावता)सेक्स केला तर Hiv होऊ शकतो

1 उत्तर

कोणत्याही एड्स नसलेल्या व्यक्तीसोबत कंडोम न लावता सेक्स केला तर एच. आय. व्ही होत नाही. पण समोरच्या व्यक्तीला सेक्स आहे की नाही, हे बाह्य लक्षणांमुळे लक्षात येत नसल्याने कंडोमचा वापर केलेला कधीच योग्य. शिवाय कंडोम वापरल्याने नको असलेली गर्भधारणा आणि एच. आय. व्ही व्यतिरिक्त इतर लिंगसांसर्गिक आजार पसरण्याचा धोका कमी होतो. एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

तुम्ही इतरही काही मुद्यांचा विचार करावा. सेक्स ही परस्परांच्या शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. यामध्ये तुमची आणि समोरील व्यक्तीची परवानगी, इच्छा आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे. वेश्या हा शब्द बऱ्याच वेळा स्ञी वेश्यांसंदर्भात वापरला जातो. परंतू, समाजामध्ये पुरूष वेश्या देखील आहेत. वेश्या व्यवसायामध्ये विशेषकरून महिलांना बऱ्याचवेळा जबरदस्तीने आणले जाते त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत असते. वेश्या व्यवसायामध्ये ग्राहक सेक्सची मागणी करतो आणि समोरील पुरवठादार व्यक्तीकडून सेक्सची सेवा ठराविक मोबदल्यात पुरवली जाते. ग्राहक आणि विक्रीदार दोघेही भावनिक गुंतवणूकीची अपेक्षा करत नाही. या प्रक्रियेमध्ये फक्त ग्राहकाला आनंद मिळण्याची शक्यता गृहित धरली जाते. पण कदाचित शरीरविक्रेय करणाऱ्या महिलेसाठी ती तितकीच आनंदायी कृती असेलच असं नाही. त्यामुळे वेश्येसोबत सेक्स करावा की नाही यापेक्षा वेश्येसोबत सेक्स करून तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला सेक्सचा आनंद घेता येणार आहे का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. वेश्यांचे त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून एकापेक्षा अनेक व्यक्तींबरोबर लैंगिक संबध येतात हे तुम्ही जाणतच असाल. त्यामुळे त्या स्वतः लैंगिक आजाराची शिकार असू शकतात किंवा त्यांच्याशी संबध ठेवणाऱ्या व्यक्तींनाही लैंगिक आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जर तुम्ही वेश्येसोबत किंवा इतर कोणासोबतही सेक्स करणार असाल तर माञ काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जसं निरोध वापरणं, मुख मैथून(oral sex) करताना तोडांत जखम तर नाही ना हे पाहणं, लैंगिक आजारांबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे. याशिवाय लैंगिक संबंध आनंददायी होण्यासाठी कोणतीही जबरदस्ती न करता परस्परांचा आदर राखणं, कोणत्या कृतीमुळे जोडीदाराला आनंद मिळतो हे पाहणं आणि खाजगीपणा जपणं या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे. सेक्स कोणाबरोबर करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे आपण स्वतःच जास्त चंगल्या प्रकारे ठरवू शकाल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 16 =