प्रश्नोत्तरेडिलेवरी नंतर mc केव्हा येते

1 उत्तर

बाळ जन्मल्यानंतर पाळीचं चक्र हळू हळू पूर्वपदावर यायला लागतं. पण पाळी लगेच सुरू होत नाही. काही स्त्रियांमध्ये बाळ झाल्यावर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येते तर काही जणींना दोन वर्षं पाळीच येत नाही. याचा संबंध बाळ अंगावर दूध पितं त्याच्याशी आहे. बाळ जर पूर्णपणे अंगावर दूध पीत असेल तर शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संप्रेरक तयार होतं ज्यामुळे पाळी चक्रासाठी आणि अंडोत्सर्जन होण्यासाठी आवश्यक इतर संप्रेरकं तयार होत नाहीत. बाळ जर दर दोन तासांनी अंगावर दूध पीत असेल तर मेंदूला निरोप मिळतो की अजून बाळ अंगावर पितंय त्यामुळे इतक्यात पुढच्या गर्भाची तयारी नको! जसजसं बाळ अंगावर कमी प्यायला लागेल तसं जनन चक्र हळू हळू पूर्वपदावर येतं आणि अंडोत्सर्जन होऊन पाळी येते. पाळी येते त्या आधी 12-16 दिवस अंडोत्सर्जन झालेलं असतं.

पुढचं बाळ लगेच नको असेल तर बाळंतपणानंतर पहिली पाळी येईपर्यंत पुरुष जोडीदाराने निरोधचा वापर करायला हवा कारण अंडोत्सर्जन झालेलं कळलंच नाही आणि नेमके त्याच काळात संबंध आले तर अशी पाळी येण्याच्या आधीच परत दिवस जाऊ शकतात. याला मराठीत ‘मिंधं राहिलं’ असं म्हणतात. ते टाळण्यासाठी पाळी येईपर्यंत निरोध वापरावा किंवा संभोग न करता इतर प्रकारे एकमेकांना शरीरसुख देता येईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंक करा.

https://letstalksexuality.com/lactation-and-menstruation/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 2 =