प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या बायकोची डिलेवरी होऊन महिना झाला आहे, तरी मला इतक्यात दुसरे मुल नको आहे.  दुसरा गर्भ राहु नये म्हणुन काय केले पाहिजे म्हणजे दुसरे मुल किती दिवसांच्या अंतराने जन्माला येऊ द्यावे. म्हणजे ते आम्हा दोघांना तसेच आमच्या पहिल्या बाळाला फायदेशीर राहील. समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे

1 उत्तर

स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी :
जर गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात, यांना गर्भनिरोधकं असं म्हणतात. ही वापरुन तुम्हाला गर्भधारणा रोखता येईल. इथे हे लक्षात ठेवा की, नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा.
https://letstalksexuality.com/contraception/
आईच्या शरीराची झालेली झीज :
दोन मुलांमधल्या अंतराचा आईच्या दृष्टीने विचार केला तर कमीत कमी दिड ते दोन वर्ष थांबणे इष्ट ठरते, कारण पहिल्या बाळंतपणात आईच्या शरीराची झालेली झीज भरुन यायला किमान एवढा वेळ लागतोच.
निर्णय दोघांचा अन अजून काही :
बाकी निर्णय तुम्ही उभय दांपत्यांनीच घ्यायचा आहे, कारण त्यासाठी काही बाबींचा विचार तुम्हालाच करावा लागणार आहे. जसे की, तुमचा पगार, घराचा व मुलांचा खर्च, बॅकेचे हप्ते किंवा अजून काही , नोकरीच्या वेळा व तुम्ही मुलांना देऊ शकणारा वेळ, तुम्हा दोघांचे वय, नवीन बाळासाठी दोघांच्या मनाची व आईची शारीरिक तयारी, इत्यादी.
लोक काय करतात:
यामध्ये ब-याच वेळा काही लोक 3 किंवा 5 वर्षानंतर दुस-या मुलाचा विचार करतात. म्हणून वरील मुद्द्यांचा विचार करुन तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल.
आपण आम्ही दिलेल्या उत्तराने समाधानी व्हाल ही अपेक्षा.
आपली प्रतिक्रिया, अभिप्राय वा सूचना आम्हाला letstalksexuality.com@gmail.com या मेलवर नक्की कळवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 16 =