प्रश्नोत्तरेनामर्द कसा होतो

1 उत्तर

कृपया तुम्हाला नक्की काय विचारायचे आहे ते समजू शकले नाही. तुमचा प्रश्न विस्ताराने विचारला तर आम्हाला उत्तर देणे सोपे जाईल. आपल्या समाजामध्ये ‘नामर्द’ हा  शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. काहीजण मुल न होऊ शकणाऱ्या पुरुषांना  तर काहीजण हिजडा/ ट्रान्सजेंडर व्यक्तींना नामर्द म्हणतात.  खरंतर अशा व्यक्तींना  ‘नामर्द’ हे विशेषण वापरून कमी लेखले जाते हे चुकीचे आहे. यापैकी किंवा याव्यतिरिक्तही जर तुमचा  काही विशिष्ट प्रश्न असेल तर विचारा आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ.

amit replied 7 years ago

अवजड किंवा लोडिंगचे काम केल्याने स्त्रीला गर्भधारणेस काही अडचण येते का?

I सोच replied 6 years ago

नाही… याचा आणि गर्भधारणेचा काही संबंध नाही…पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संभोग केल्यानेदेखील गर्भधारणा होत नसेल तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 6 =