प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपत्नीची योनी सैल आहे .

मी २५ वर्षीय तरूण असून माझे शिश्न लहान म्हणजेच ३ इंच आहे .माझ्या लग्नाला एक वर्ष झाला आहे . लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सैक्स करताना पत्नीच्या योनीत सैलपणा आहे , योनी मार्ग खुप सैल आहे . योनीत लिंग प्रवेश सहज होतो . सेक्सचा आनंद मिळतच नाही . तसेच तिला आजपर्यंत गर्भधारणाही झाली नाही .मी खुप अस्वस्थ आहे . कारण आवघं आयुष्य समोर आहे अजुन ‘ कृपया काही उपाय

1 उत्तर

सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगावेसे वाटते की यामध्ये अस्वस्थ होण्यासारखे काहीही नाही. तुम्हाला पडलेले प्रश्न महत्वाचे आहेत त्याविषयीची काही तथ्ये  आणि शास्त्रीय माहिती समजून घेऊया.
१. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे तुमचे लिंग ३ इंच आहे. खरंतर ही समस्या नाही. यात काहीही काळजी करण्यासारखे नाही त्यामुळे निश्चिंत रहा. शात्रीयदृष्ट्या सांगायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग लहान आहे की मोठे यापेक्षा  संबंधाच्या वेळी ते ताठ राहते का ? तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळते का? हे जास्त महत्वाचं आहे. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
२. योनीमध्ये सैलपणा असू शकतो यामुळे खरंतर गर्भधारणा आणि लैंगिक सुख यामध्ये काहीही अडचण येत नाही. योनीमार्ग, मूत्रद्वार आणि गुदद्वार या तीनही मार्गांच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये घट्टपणा आणण्यासाठी, सैलपणा कमी करण्यासाठी डॉ. केगल यांनी सुचवलेला व्यायाम केला जातो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/question/kegel-exercise/ या लिंकवरील माहिती वाचा. लिंग- योनी मैथुन करताना जास्त घर्षण झाले तरच लैंगिक सुख मिळते आणि हाच फक्त लैंगिक सुख मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे असा गैरसमज आपल्या समाजात आढळतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद वाढवून लैंगिक समाधान मिळवण्याच्या नवनवीन पद्धती शोधू शकता. तुम्हाला आणि जोडीदाराला नक्की कशातून आनंद मिळतो याविषयी मनमोकळा संवाद तुम्हाला फायदेशीर ठरले.
३.आता तुमचा शेवटचा प्रश्न गर्भधारणेविषयी. इतके अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही. गर्भधारणा होण्यासाठी एक शुक्राणू देखील पुरेसा असतो त्यामुळे योनीमार्ग सैल  असण्याचा किंवा लिंगाची लांबी कमी असण्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. आत्ता तर लग्नाला एक वर्ष झाले आहे आणि तुम्हीच म्हंटल्याप्रमाणे अजून संपूर्ण आयुष्य समोर आहे. त्यामुळे घाई आणि चिंता करण्याचे  कारण नाही. गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. गर्भधारणा कशी होते हे समजून घ्या https://letstalksexuality.com/conception/. आपल्या समाजामध्ये बऱ्याचदा गर्भधारणा होत नसेल किंवा मुल होत नसेल तर स्त्रीला जबाबदार धरले जाते, हे चुकीचे आहे. गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष दोघे जबाबदार असतात. गर्भधारणा न होण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि उपचारांसाठी दोघेही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 20 =