प्रश्नोत्तरेपाळी असल्यावर सेक्स केल्यास धोका असतो का

1 उत्तर

तुम्हाला गर्भधारणेचा किंवा लैंगिक आजारांशी संबंधित आजारांचा धोका असे सुचवायचे आहे का? पाळी चालू असताना शरीर संबंध आले तर गर्भधारणा होणार नाही अशी एक समजूत असते. बहुअंशी ती खरी असते कारण स्त्री बीज परिपक्व व्हायला (अन्डोत्सर्जन-ओव्युलेशन) अजून अवधी असतो. पण तसं असलं तरी त्या काळातही गर्भधारणेची काही शक्यता असते. विशेषतः जर एखाद्या स्त्रीचे पाळी चक्र लहान म्हणजेच २४-२५ दिवसांचे किंवा त्याहून लहान असेल तर. अशा वेळी अन्डोत्सर्जन लवकर होते. पुरुष बीज चार ते पाच दिवस योनी मार्गात किंवा गर्भाशयात सक्रीय असू शकतात. त्यामुळे पाळी संपताना संबंध आले तर त्यातून गर्भधारणा होण्याची शक्यता राहते. पाळी दरम्यान शरीर संबंध या विषयी माहितीसाठीही काही लिंक्स देत आहोत. त्या वाचा.

https://letstalksexuality.com/sex_during_periods/

https://letstalksexuality.com/question/sex-during-menstruation/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 15 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी