प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळी नंतर 5 व्या दिवशी सेक्स केला आहे कंडोम शिवाय

मी माझ्या gf सोबत पाळी नंतर 5 व्या दिवशी सेक्स केला आहे कंडोम शिवाय ….पण जेव्हा वीर्य बाहेर येतय असं वाटलं तेव्हा मी लिंग बाहेर काढलं पण असं वाटतय की 20% वीर्य आत गेल आणि 80% बाहेर पडलं …..तर मला सांगा गर्भधारणा होण्यासाठी किती वीर्य आत जावं लागतं? आणि माझं लिंग योनीत जास्त आत पण गेलं नव्हतं

1 उत्तर

मित्रा, कमी वीर्य आत गेले याचा अर्थ गर्भधारणा होणार नाही असे नाही. एक वीर्याच्या थेंबात अनेक शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी एक शुक्राणू पुरेसा देखील पुरेसा असतो. आता राहिला प्रश्न गर्भधारणा होण्याचा. पाळीच्या पाचव्या दिवशी संबंध आले म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते पण नाकारता येत नाही. मासिक पाळीच्या कोणत्या काळात गर्भधारणा होते हे प्रत्येक स्त्रीचं पाळीचक्र किती दिवसांचं आहे यावर अवलंबून असतं. पाळीचक्र खूप लहान असेल (२८ किंवा २५ दिवसांपेक्षा कमी) तर लवकर अंडोत्सर्जन होते. पाळीचक्र खूप लहान असेल आणि ५ व्या दिवशी संबंध आले तर गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/contraception/

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 17 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी