प्रश्नोत्तरेफायमोसिस: चेऑपरेशन करण्यासाठी नेमका किती खर्च येईल व त्या साठी कोणत्या डॉक्टर चा सला घायला पाहिजे ?? ऑपरेशन नंतर आराम किती दिवस घ्यावा लागेल

फायमोसिस: चेऑपरेशन करण्यासाठी नेमका किती खर्च येईल व त्या साठी कोणत्या डॉक्टर चा सला घायला पाहिजे ??

ऑपरेशन नंतर आराम किती दिवस

घ्यावा लागेल

2 उत्तर

१. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर सुंता करणं आवश्यक असतं. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/male-circumcision/

२. ही शस्त्रक्रिया करायची असल्यास एखाद्या सर्जन डॉक्टरांकडे जावे लागेल. तुम्हाला सुंता करण्याची आवश्यकता आहे की नाही हे तपासून घ्या. डॉक्टरांनी तसं निदान केलं तर एक छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. हे केल्याने लैंगिक सुखास बाधा येत नाही.

३. या शस्त्रक्रियेसाठी किती खर्च येतो आणि किती दिवस आराम करावा लागेल हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतील.

याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत तेदेखील नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 14 =