सुंता करणे

सुंता

शिश्नाच्या पुढील भागावरील सैल त्वचा (प्रिप्युस) शस्त्रक्रियेद्वारे काढून शिश्नमुंड उघडे करण्याच्या पद्धतीला सुंता असं म्हणतात. सुंता करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –circumcision

1.शिश्नमुंडाच्या खालील भागात मळ साचून राहत नाही त्यामुळे शिश्नमुंड स्वच्छ राहते. त्याला कसलाही वास येत नाही.

2. शिश्नमुंडावरील पातळ त्वचेवर बारीक सारीक इजा होण्याचा धोका टळतो. एचआयव्ही संसर्ग व लैंगिक संबंधांद्वारे पसरणारे इतर आजार होण्याचा धोका सुंता केलेल्या व्यक्तींमध्ये कमी प्रमाणात असतो असं शास्त्रीय पुराव्यानुसार दिसून आलं आहे.

3. बालवयापासून शिश्नमुंडावरील त्वचा मागे सरकत नसेल किंवा काही स्थानिक जंतुसंसर्गामुळे जननेंद्रियावर सूज आली असेल किंवा लैंगिक संबंधांद्वारे पसरणाऱ्या आजारांमुळे मागे गेलेली त्वचा पुढे येत नसेल तर अशा व्यक्तींमध्ये सुंता करणं आवश्यक ठरतं.

सुंता करण्याचे काही तोटे नाहीत. मात्र कोणतीही जंतुलागण टाळायची असेल तर निर्जंतुक केलेली उपकरणंच वापरली पाहिजेत. स्वच्छ व निर्जंतुक जागीच शस्त्रक्रिया करायला पाहिजे. ही काळजी घेतली तर सुंता करण्याचे काही तोटे होत नाहीत.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

55 Responses

 1. Vasudev says:

  माझं वय 27 वर्ष आहे. मग मला आता सुंता करता येईल का?

  आजवर सुंता फक्त मुस्लिम समजतच केलेली आढळली आहे.

  जरूर सांगा. ?

 2. I सोच says:

  तुम्हाला सुंता का करायची आहे ?

  लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही. योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असेल. (फायमॉसिसची माहिती ‘मानवी लैंगिकता’ या बिंदू माधव खिरे यांच्या पुस्तकातून साभार)

 3. Amol jagtap says:

  सुता करण्यासाठी खर्च किती येतो

  • I सोच says:

   याविषयीचा अंदाज तुम्हाला डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्येच कळू शकेल. हवं तर एक- दोन ठिकाणी चौकशी करा.

  • ज्ञानेश्वर मते says:

   माझे वय 20 आहे.माझ्या शिस्नमुंडा वरची त्वचा खूप टाईट आहे त्यामुळे मागे सरकवता येत नाही.प्लीज उपाय सांगा.

   • बऱ्याच पुरुषांना असा त्रास होत असतो. आम्ही आपल्याला सुचवू की तुम्ही डॉक्टरांना भेटा, सद्यस्थिती पाहून काय करायचं याचा तेच निर्णय घेतील.

 4. amod says:

  सुंता करणे चांगले आहे

 5. Ak says:

  Maze age 26 ahe mazi katdi mage jaat nahi ahe plz upay sanga

  • I सोच says:

   तुम्हाला होणारा त्रास कधीपासून होतो आहे, याबाबत काही लिहिले नाही आहे. तुर्तास आपल्याला असणारी समस्या ही निरिक्षण करुन, नंतर त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. तेव्हा एखाद्या तज्ञ डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवावे.
   पुढिल वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ येथे विचारावा.

 6. Suryakant says:

  सुंंता केल्यावर काही त्रास होतो का व शारीरिक संबंध कधी करायचे

  • सुंता केल्यावर पहिल्या दोन दिवसात लिंगाच्या टोकावर थोडी सूज आणि जखम असू शकते. हे सामान्यत: फार वेदनादायक नसते. वेदनाशामक औषधांनी फरक पडतो. सुंता झाल्यानंतर कमीतकमी 42 दिवसांनंतर लैंगिक संबंधांसाठी सुचवले जाते, कारण खुल्या जखमांमुळे HIV वा इतर लिंगसांसर्गिक आजार होण्याचे धोके कैक पटीने वाढतात.

   पुढिल वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता वाचकांसाठी एक खास जागा केली आहे, https://letstalksexuality.com/ask-questions/ येथे विचारा.

 7. Vishal says:

  माझे लिंग ताठ झाल्यावर स्किन मागे जाते पन लिंग बारीक झाल्यावर स्किन पुन्हा पुढ येते तर मला ती स्किन कायमचीच मागे ठेवन्यासाटी काय करावं लागेल……

  • डॉक्टरांना भेटून तुमची अडचण सांगा, तपासणी करून सुंता करू शकता का नाही याबाबत डॉक्टर नक्की मार्गदर्शन करतील.

   • Sachin bhagat says:

    Maze age 20 aahe maze lingache katde sukle ki mage jate taite jhalyawar mage jaat nahi upay suchawa.. Please***

    • जर खूपच त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटा, ते योग्य तो उपचार करतील.
     तुमच्या सारखी समस्या ब-याच पुरुषांना जाणवते. घाबरुन जाऊ नका. बिनधास्त डॉक्टरांना भेटा.

 8. Saurabh says:

  डॉक्टर माझ्या लिंगाच्या एका बाजूची कातडी निघालेली आहे परंतु दुसऱ्या बाजूची निघाली नाही मी काय करू

  • परिस्थिती काय आहे हे पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. तेव्हा तुमची अडचण जर डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून सांगितली तर त्यावर लवकर उपाय करता येईल, म्हणून तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांची मदत घ्या.

 9. Sameer says:

  माझ वय २७ वर्षे आहे काही कारणामुळे लहान पणी माझी सुंता झाली …जर मी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले (निरोध न वापरता ) तर मला एच.आय.व्हि …एडस किंवा इतर लैंगिक आजाराची बाधा होईल का

  • कुणाही व्यक्तीचे असुरक्षित लैंगिक संबंध आले व समोरच्या व्यक्तीला एच.आय.व्हि/ एडस किंवा इतर लिंगसांसर्गिक आजार असतील तर त्याचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. तेव्हा लैंगिक संबंध ठेवताना निरोध वापर करणे फार महत्वाचे आहे.
   अधिक माहितीसाठी पुढील लिंकवरील लेख वाचा व सोबत त्याखालील कमेंट ही वाचा.
   https://letstalksexuality.com/hiv_aids/
   https://letstalksexuality.com/safe-sex/
   https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

   • Sameer says:

    माझी सुंता झालेली आहे …समोरच्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार नसेल तर मी निरोध न वापरत संबंध ठेवलै तर मला काही धोका आहे का

    • धोका तर आहेच ना !!
     आपल्याला उघड्या डोळ्यांनी सगळेच आजार दिसताच असे नाही ना. बरेच आजार चाचणी केल्याशिवाय नाही लक्षात येत. त्यामुळे सुंता केली म्हणुन अशी काही रिस्क घेत असाल तर तर सावध व्हा व संबंधावेळी निरोधचा वापर नेहमीच करा.

 10. Kiran says:

  Mala fimosis aahe kontya doctorana bhetu

  • तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांना भेटा ते सुद्धा तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करतील.

 11. Datta Parbhane says:

  माझे लिंग वरचे कातडे मागे जाते पण पूर्ण मागे जात नाही काय करावे

  • मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात.याबाबत तुम्ही वरील लेख वाचला आहेच. या शस्त्रक्रियेसाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य आहे.

 12. Swaraj says:

  मी 22 age चा आहे आणि लिंगाची स्कीन पुर्णपणे मागे येत नाही मधेच राहते. यासाठी मी कोणता उपाय करू .

  • शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्यावं लागेल. तेच यावर योग्य ते मार्गदर्शन करतील. सुंता करण्याची गरज असल्यास डॉक्टर तसा निर्णय तुम्हाला सांगतील.

 13. Swaraj says:

  मी 22 age चा आहे . व शिश्नाच्या खालच्या बाजुची जोड चांबडी म्हणजे शिश्नामुंडाखालची चांबडी ही जोड आहे मागे स्कीन घेताना खुप दुखते आणि वरची खुली राहते व खालची बंद स्थितीत असते. Plz मला मदत करा.. सुंता व बारीक शस्त्रक्रिया करावी लागेल का …

  • तुमची समस्या ध्यानात येते आहे. खूप पुरुषांना असा त्रास होतो. काही काळाने हा त्रास संपतो ही. पण तुम्हाला खूप त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटा. तुमची सद्य परिस्थिती पाहून सुंता करायची गरज आहे की नाही याबाबत तेच मार्गदर्शन करतील.

 14. माझे वय 67 आहे. सुंता करणे योग्य आहे का

  • तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटून घ्या. या वयात तपासणी केल्याशिवाय असं हो नाही सांगणं कठीण आहे.

 15. Jalindar pachpute says:

  सुंता करण्यासाठी पुण्यातील डॉ.सुचवा

  • तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटा तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. सुंता करायची की नाही याचा निर्णय आपण मनाने घेण्यापेक्षा डॉक्टरांशी बोलुन घ्यावा, असं आम्ही सुचवू.

 16. Sunny says:

  माझे वर 23 आहे. मला सुंता करता येईल काय

  • हो येईल की, पण त्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे.

  • Aditya shigvan says:

   सर माझे वय २५ चालू आहे आणि मला हस्तमैथुन इच्छा झाल्यावर करायला आवडते पण मला याची हळूहळू सवय झाली आहे आणि त्यातच माझ्या लिंगाची जाडी वाढली असून लिंगाच्या पुढची त्वचा मागे सरकत नाही ताठरता आल्यावर त्यामुळे माझ्या लिंगाची लांबी आणि वाढ खुंटली आहे आणि मी एकदा संभोग करताना योनीतच लिंगाची त्वचा मागे गेल्याने खूप त्रास झाला होता यासाठी काही उपाय सांगावा

   • हस्तमैथुनाचा व लिंगाच्या जाडीचा वा लिंगावरील त्वचा पुढे मागे होण्याचा तुम्ही लावत आहात तसा संंबंध लावणे जरा घाईचे होईल. लिंगावरील त्वचा मागेच राहिल्याने ब-याच लोकांना सुरुवातीला त्रास होतो नंतर ठिक होते हे तुम्ही वर वाचलेले असेलच.
    तुम्हाला जर खूपच त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटा. तेच तपासणी करुन योग्य ते मार्गदर्शन करतील.

 17. Laxman pardhi says:

  माझ वय 30 वर्ष आहे
  माझ्या लिगाचा वास येतो माझ्या लिगाच कातडी कायमच मागे राहत नाही

  • लिंंगाची स्वच्छता नसल्यास वास येऊ शकतो. अंघोळ करताना लिंगावरील त्वचा मागे घेऊन स्वच्छता करुन फरक पडतो का पहा. अन्यथा डॉक्टरांना भेटावे लागेल.
   लिंगाची त्वचा कायम मागे का हवी आहे? ब-याच लोकांची नाही राहत मागे. जर तुम्हाला लिंगावर त्वचा नको हवी असल्यास डॉकटरांना भेटा. ते मार्ग सुचवतील.

 18. Aditya shigvan says:

  सर माझे लिंगाच्या खालील अंडाशयतील उजवे अंडकोश (oneside) वरती आले आहे आणि डावे अंडकोश आहे तसे आहे मला वाटते की हे जिम व्यायाम प्रकार मुळे घडले असावे प्लिज यावर उपाय सांगावा काय करावे लागेल जेणेकरून भविष्यात काही समस्या उद्भवेल…

  • त्यात काही विशेष नाही. सामान्यापणे अंडकोशाची स्थिती तशीच असते. एका साईडचे अंडकोश किंचित वर असतात. त्यामुळे चिंता नको.
   पण तुम्हाला काही त्रास होत असेल, शरीर संबंध करताना वेदना होत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 19. Sanjay says:

  सर्वांना माझा अनुभव सांगतो तो असा की माझी ही शिश्न वरील त्वच्या मागे सरकत नव्हती वयाच्या 15 ते 16 व्या वर्षापर्यंत पण मी रोज ती स्किन सहन होईल तोवर व तेवढीच मागे करत असे. काही महिन्यातच माझी शिश्न ची पूर्ण स्किन मागे होऊ लागली आहे याचा काहीही अपाय नाही तुम्ही अनुभव घेऊ शकता.

 20. Sanjay Ghogare says:

  माझ्या लिंगावरील समोरील कातडीस कायम चिरा होऊन जखमा होतात त्यामुळे लैंगिक संबंध तर होतच नाही तर त्रास दायक वेदना होऊन कातडी मागे जात नाही घेतल्यास जखमा तुन रक्त येते त्याकरिता डॉ ना दाखवले तर फंगल इन्फेक्शन मुळे अस होऊ शकते असे म्हणतात आणि क्रीम गोळ्या दिले जातात परंतु ते औषध चा प्रभाव असेपर्यंत कमी होते पुन्हा तसाच प्रकार होतो त्याकरिता यावर कायमस्वरूपी उपाय सुचवावा ही विनंती

  • तुम्ही पुन्हा डॉक्टरांना भेटा व तुमची अडचण नव्याने सांगा.
   जर फंगल इंफेक्शन झाले किंवा होत आहे यामागचे कारण शोधणे गरजेचे आहे. काही वेळेस जोडीदाराला इन्फेकशन असेल व त्यावर उपचार केले नसतील तरी त्यातून तुम्हाला वारंवार इन्फेकशन होण्याची शक्यता असू शकते. त्या केसमध्ये तुम्ही दोघांनीही उपचार केल्यास तुमची समस्या निकाली निघू शकेल. शक्य झाल्यास या विषयातील तज्ञ डॉक्टरांची मदत घेतल्यास उत्तम. तसेच इन्फेकशन पूर्ण बरे होईपर्यन्त निरोधचा वापर करणे गरजेचे आहे.

 21. Ashwin baburao sonule says:

  माझे वय 32 आहे..लिंगावरची त्वचा मागे जात नाही..फॅमिली डॉक्टर नाही तर मी कोणत्या डॉक्टरांना भेटू

  • शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरां कडून तपासून घ्यावं लागेल. फ़ॅमिली डॉक्टर नसले तरी तुम्ही तुमच्या भागातील शल्य चिकित्सक (Surgeon) किंवा मूत्रतज्ञ (Urologist) यांना भेटलात तरी चालेल. तपासणी नंतर डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील.

 22. Sagar Gijare says:

  सर माझ्या लिंगाची त्वचा मागे झालेली आहे ती पुढे येण्यासाठी काय उपाय आहे

  • तुम्ही ती त्वचा पुढे आणायचा प्रयत्न करा, किंवा केला ही असावा. या साठी तुम्हाला डॉक्टरांना भेटावं लागेल. तेच निरिक्षण करुन योग्य तो उपचार करतील.

 23. ganesh pawar says:

  सर माझ्या लिंगाच्या वरची त्वचा निघालेली आहे पण खालच्या बाजूची तशीच चिकटून राहिलेली आहे तरी ती निघण्यासाठी काय करावे लागेल

  • लिंगाच्या खालच्या बाजुला त्वचा चिकटलेली असणं हे सामान्य आहे, पण त्यामुळे काही त्रास होत असल्यास त्यासाठी उपचार उपलब्ध आहेत, त्यासाठी डॉक्टरांना भेटावे लागेल.

 24. Ramdas says:

  मला खूप त्रास आहे याचा मी जेंव्हा पण सेक्स करतो. तेव्हा मला माझी कातडी पाठीमागे गेल्यानंतर मला खूप त्रास होतो. आणि सेक्स करण्यात असमर्थता जाणवते

  • तुम्हाला होणारा त्रास आम्ही समजू शकतो. जेव्हा शिस्नावरची त्वचा शिस्नमुंडामागे जायला त्रास होतो त्याला phimosis म्हटले जाते किंवा ही त्वचा मागे जाऊन अडकून राहते त्याला paraphimosis असे म्हणतात. या दोन्ही ही वेळी त्रास होणे फार साहाजिक आहे. अन ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण जर त्यामुळे शिस्नाला सूज आली असेल किंवा वेदना होत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास डॉक्टर ही त्वचा कायमची काढून टाकतात. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/male-circumcision/

 25. किरण चव्हाण says:

  लहान मुलाची सुंता केल्यावर लिंगा चा आकार व लांबी वाढु शकते का

  • सुंता करण्याचा आणि लिंगाच्या आकाराचा काहीही संबंध नाही. जर डॉक्टरांनी काही वैद्यकीय कारणास्तव सुंता करण्यास सुचवले असेल तर अशी शस्त्रक्रिया करण्यास काहीच हरकत नसावी. कारण वैद्यकीय कारणास्तव लहानपणी सुंता केली जाणे हे फार नॉर्मल आहे. घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. पण वैद्यकीय कारण नसेल तर सुंता करण्याची काहीही शारीरिक गरज नसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap