प्रश्नोत्तरेमाझी पत्नी हल्ली माझा बरोबर संभोग करताना योनीत ओलावा येत नाही त्यामुळे माझ्या मते ती चे पर पुरशा बरोबर संबघ आले आहेतका त्या मुळे त्या मी तीला कमी सुख देत आहे का पण ती तसे काही नाही असे ती मला सांगते मी तीला आपण डॉ कट्टर कडे दाखुया असे सांगितले तर ती म्हणाली की मी नॉर्मल आहे मला काही झालेले नाही त्यामुळे ती च्या अशा वागण्याने मला काही कळत नाही
1 उत्तर

लैंगिक संबंधांच्या वेळी योनीमध्ये ओलावा येत नाही एवढ्या कारणावरून तुमच्या जोडीदाराचे दुसऱ्या पुरुषासोबत लैंगिक संबंध आले असतील असा संशय घेणे किंवा तुम्ही तिला लैंगिक सुख देऊ शकत नाही असा अंदाज बांधने योग्या नाही.

लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीमध्ये ओलसरपणा वाढतो म्हणजे नक्की काय होते, हे समजून घेऊयात. स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होणार नाही. म्हणूनच लैंगिक संबध करत असताना संमती आणि इच्छा खूप महत्वाची आहे.

योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं. योनीतील ओलसरपणा वाढविण्यासाठी काहीजण कृत्रिम वंगण(लुब्रींकंट)/जेली चा वापर करतात. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला.

योनिमधील ओलावा कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मेनोपॉज. वयाच्या 45-50 च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं याला मेनोपॉज असं म्हणतात. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतर स्त्रीमध्ये काही शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. लैंगिक इच्छा आणि भावभावनाही बदलू शकतात. योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं हा एक होणाऱ्या बदलांपैकी एक बदल आहे. मेनोपॉजविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/menopause/

या परिस्थितीमध्ये दोघांनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. उगाचच संशयाचे भूत डोक्यावर घेऊन बसू नका. तुमच्या जोडीदाराला लैंगिक संबंधांमध्ये काय आवडतं हे समजून घ्या. लैंगिक संबंधांमध्ये नाविन्य आणता येईल.

तुमच्या माहितीसाठी लैंगिक सुखास पूरक घटक आणि लैंगिक सुखास मारक घटक याविषयीचा लेख देत आहे. त्याचा देखील तुम्हाला उपयोग होईल.

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

https://letstalksexuality.com/9907-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 10 =