प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझे वय 30 वर्ष आहे. आणि या वर्षी लग्न करायचे आहे ,पण सेक्स चा अनुभव नाही . त्यात माझे लिंग वरच्या बाजूला curve आहे त्यामुळे सेक्स ची भीती वाटते । माझ्या लिंगाला पाहून माझ्या पार्टनर च्या मनात काय विचार येईल हा प्रश्न नेहमी सतावत राहतो. वाकडे लिंग शस्त्रक्रिया न करता मालिश वगॆरे ने सरळ करता येईल का?

2 उत्तर

काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लिंगातील वाकडेपणा हा बऱ्याच पुरुषांना सतावणारा प्रश्न असतो परंतु नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो.

फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.

पार्टनर काय विचार करेल याचा आत्तापासूनच विचार करू नका आणि टेन्शन घेऊ नका. संभोग करताना काही अडचण येत असेल तर मोकळेपणाने तुमच्या जोडीदाराशी बोला. तुमची भीती देखील शेअर करण्यास हरकत नाही. तुमच्या पार्टनर च्या मनातदेखील सेक्सविषयी भीती, शंका, प्रश्न असतीलच की ! तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोला. या सगळ्या विषयी मनमोकळा संवाद हा लैंगिक सुखामधील एक महत्वाचा पैलू आहे.

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरील लेख आणि ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

पुरुषाचं शरीर :- https://letstalksexuality.com/male-body/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 10 =