योनिस्राव किंवा वीर्य यांचा त्वेचेशी संपर्क आला तर एच. आय. व्ही. होत नाही. समोरच्या व्यक्तीला एच.आय.व्ही असेल तर लैंगिक संबंधांतून हा आजार पसरतो. एच.आय.व्ही. -एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/hiv_aids/
आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/
सेक्स केल्यानंतर कंडोम हाताने काढल्यावर एचआयवी होतो का
एखाद्या व्यक्तीला एच. आय. व्ही. असेल तरच त्या व्यक्तीकडून एच.आय.व्ही. ची लागण होऊ शकते. शिवाय एच.आय.व्ही. पसरण्यासाठी एच.आय.व्ही. असलेल्या लैंगिक स्त्रावांचा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश होणे जरुरीचे असते. त्यामुळे हातावरील त्वचेला जखम किंवा ओरखडे नसतील तर हातावर वीर्य पडल्याने किंवा हाताला लैंगिक स्त्राव लागल्याने एच.आय.व्ही. शरीरात शिरणार नाही.