प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंगातील वाकडेपणा

कोणत्या कारणामुळे लिंगात वाकडेपणा येतो ?

1 उत्तर

नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो, लिंग थोडेसे वाकडे असते. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो.

फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.

आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरील लेख आणि ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

पुरुषाचं शरीर :- https://letstalksexuality.com/male-body/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 1 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी