प्रश्नोत्तरेविर्य कसे तयार होते

1 उत्तर

वीर्यामध्ये वीर्य कोषातील स्त्राव व शुक्राणू यांचा समावेश असतो. वीर्याची निर्मिती कुठे आणि कशी होते हे समजून घेऊयात. प्रत्येक पुरुषास दोन वृषण असतात. मुलगा वयात आल्यावर या वृषणांमध्ये शुक्रजंतूंची निर्मिती होत असते. शिश्नाच्या खालील बाजूस वृषण असते. या वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. या दोन्ही बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. पोटात जिथे मूत्राशय असतं, त्याच्या मागच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. बीजकोषात पुरुषबीजं तयार व्हायला लागतात. पुरुषबीजं बीज कोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीर्यकोषात जातात. वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात. तयार झालेले वीर्य शिश्नातून बाहेर पडते. शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वीर्यामध्ये शुक्राणू आणि इतर घटक पदार्थ असतात. शुक्राणूमुळे गर्भधारणा होऊ शकते. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरिराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची गरज असते. त्यामुळे वृषण शरीरापासून थोडे वेगळे असतात.
माहित असावं:
अ) मन उद्दीपित झाल्यावर किंवा कधी कधी झोपेतही वीर्य बाहेर येतं. यात काहीच चुकीचं नाही.
ब) रक्ताच्या 100 थेंबापासून वीर्याचा एक थेंब तयार होतो हा समज साफ चुकीचा आहे.
क) रोज लाखो पुरुषबीजं म्हणजेच शुक्राणू तयार होतात आणि वीर्यातून बाहेर पडतात. त्याला जपून ठेवण्याचे काहीच कारण नाही.
ड) पुरुषबीजाचा स्त्रीबीजाशी संयोग झाला तर गर्भधारणा होते.
इ) एक चमचा(5 मिलिमीटर) वीर्यामध्ये 10 करोड शुक्राणू असतात.
 
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.
 

पुरुषाचं शरीर

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 14 =