प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहनिमून : अंडोत्सर्जन काळ टाळून इतर दिवशी सेक्स करण्याचा पर्याय म्हणालात त्या प्रमाणे समजा महिन्याच्या १० तारखेला मासिक पाळी असल्यास तिने पाळी पुढे ढकलण्यासाठी १५ तारखे पर्यंत म्हणजे ५ दिवस गोळ्या घेतल्या, आणि त्या दरम्यान १० ते १५ तारीख या पाच दिवसात पाळी पूर्वी ५ दिवस सतत आम्ही बिना कंडोम सेक्स केला तर गर्भधारणा राहण्याचे किती टक्के चान्सेस आहेत?

हनिमूनला गेल्यावर बिना कोंडोम सेक्स कसा करता येईल यावर मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद.

तुम्ही दिलेल्या उत्तराला अनुसरून मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे.

तुम्ही जो अंडोत्सर्जन काळ टाळून इतर दिवशी सेक्स करण्याचा पर्याय म्हणालात त्या प्रमाणे समजा महिन्याच्या १० तारखेला मासिक पाळी असल्यास तिने पाळी पुढे ढकलण्यासाठी १५ तारखे पर्यंत म्हणजे ५ दिवस गोळ्या घेतल्या, आणि त्या दरम्यान १० ते १५ तारीख या पाच दिवसात पाळी पूर्वी ५ दिवस सतत आम्ही बिना कंडोम सेक्स केला तर गर्भधारणा राहण्याचे किती टक्के चान्सेस आहेत?

1 उत्तर
Answer for हनिमून answered 6 years ago

नियोजन :
तुम्ही सांगितल्यानूसार तुमचे लग्न होणार आहे, अन तुम्ही तुमचे पुढचे नियोजन करत आहात. कुठल्याही प्रकारचे शरीरसंबंध करताना त्यात दोन व्यक्तिंच्या संमतीचा, सहमतीचा विचार फार महत्वाचा असतो. तुमच्या प्रश्नामधून तुमच्या जोडीदाराची संमती, सहमती याचा अंदाज आम्हाला येत नाही आहे, तिची काय इच्छा आहे हे जाणवत नाही. या सगळ्या नियोजनात तिचं म्हणणं फार महत्वाचे आहे.
फक्त सुख नाही तर सुरक्षितताही महत्वाची :
खरं तर निरोध वापरुन केले जाणारे संबंध हे सेक्समधली मजा घालवतात, असं खूप लोकांना वाटते. पण सुराक्षितता हा मुद्दाही खूप महत्वाचा आहे, त्याला दुर्लक्षित करुन चालणार नाही.
आपली व जोडीदाराची काळजी :
तुम्ही ज्या प्रकारे गोळ्या घेऊन संबंध ठेवण्याबाबत विचार करत आहात, त्यातही गर्भधारणा होणारच नाही अशी 100% खात्री देता येत नाही. निरोध हाच उत्तम व सोपा पर्याय आहे. ज्यात कुणालाही आपल्या शरीराशी खेळ करावा लागणार नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्या फार महत्वाचा :
स्त्री बीज बीजकोषातून बाहेर येण्याची प्रक्रिया विशिष्ट संप्रेरकांवर अवलंबून असते. संप्रेरक गोळ्या किंवा तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या स्त्री बीज बीजकोषातून बाहेर पडू देत नाहीत आणि त्यामुळे अर्थातच गर्भधारणा होऊ शकत नाही दर 3 महिन्यांनंतर 1 महिना गोळ्या न घेता पाळी चक्र नीट काम करतंय का? तेही पाहणं गरजेचं आहे. सलग वर्षानुवर्षं गोळ्या घेणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्यांचा वापर करणे गरजेचे असते.
जोडीदार म्हणून हे महत्वाचेच :
आपण लोक महिलांनी अशा प्रकारच्या गोळ्या खाणं फार सहज घेतो, आपल्याला संवेदनशीलपणे या गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे, त्यातल्या त्यात पुरुषांनी जास्तच!! तेव्हा तुम्ही एकमेकांच्या संमतीने डॉकटरांच्या सल्ल्याने योग्य तो निर्णय घ्याल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!!
संमती म्हणजे नक्की काय ? यासाठी खालील लिंक नक्की पहा.
https://letstalksexuality.com/what-is-consent/
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी काय करता येईल त्यासाठी पुढील लिंक पुन्हा पहा.
https://letstalksexuality.com/contraception/
निरोध का महत्वाचा आहे त्याबाबत खालील लेख वाचा
https://letstalksexuality.com/safe-sex/
असुरक्षित संबंधानंतर तातडीने घ्यावयाच्या गोळ्यांबाबत काय सावधनगिरी बाळगायला हवी याच्या माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/ecp/
आता पुरुषांसाठीही आली गर्भनिरोधक गोळी! लिंक पहा
https://letstalksexuality.com/male-contraceptive-pills/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 11 =