हस्तमैथुन asked 2 years ago

हस्तमैथून केल्याने बारीक किंवा शरीर सडपातळ होते का ? खाल्लेले अन्न अंगी लागत नाही का?

आणि जर दररोज केलं तर चालते का .

कृपया सांगावे..

1 उत्तर

हस्तमैथुन ही निरोगी, शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. याबद्दलचे काहीही नियम नाहीत आणि हस्तमैथुनाचे काहीही वाईट परिणाम होत नाहीत. हस्तमैथुनाने ना शरीर बारीक होते ना सडपातळ ना कमजोरी येते, ना अशक्तपणा! बारीक किंवा सडपातळ शरीर असण्याची वेगळी कारणे असावीत , हस्तमैथुनाने असे काहीही होत नाही. तुम्हाला त्रास होत नसेल तर कितीही वेळा हस्तमैथुन करणे सामान्य आहे.
अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.
https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/
https://youtu.be/H6UzQbqNqh4
जर तुम्हाला याविषयी अजून बोलायचे असेल तर आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883 या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 1 =