1 समस्या asked 7 years ago

आधीच शारीरिक संबध ठेवले असतील त्यात सील तुटले असेल तर लग्नकरताना त्याचा काही परिणाम होऊ शकतो का ……???

1 उत्तर
Answer for 1 समस्या answered 7 years ago

तुम्ही लिहिताना एक समस्या असं विचारलं आहे पण ही समस्याच नाही त्यामुळे काळजी करण्याचे काही एक कारण नाही. लग्नाआधी संबंध आले असतील तर लग्नानंतरच्या लैंगिक आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही. तसेच लग्नाआधी लैंगिक संबध आले आहेत की नाहीत हे ओळखण्याचा कोणताही खात्रीशीर मार्ग नाही. स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे. अधिक माहितीसाठी खलील लिंक वरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/virginity/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 12 =