१८ वर्षे पूर्ण वयाच्या मुलाने सेक्स करण्यास काहीही हरकत नाही. मात्र सेक्स करताना जोडीदाराची संमती आवश्यक आहे तसेच जोडीदारही वयाने १८ वर्षापुढील असावा . जोडीदाराच्या संमतीशिवाय केलेला सेक्स कोणत्याही वयात गुन्हाच ठरतो.
भारतामध्ये कायद्यानुसार सेक्ससाठी संमती वय १८ वर्षे आहे. भारतामध्ये १८ वर्षाखालील वय हे संमती देण्याचं किंवा लैंगिक संबंध म्हणजे काय, संमती म्हणजे काय हे कळण्याचं वय नाही असं मानलं जातं . त्यामुळे १८ वर्षाखालील व्यक्तीबरोबर जर कुणी जबरदस्तीने किंवा फसवून, लबाडीने लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम, २०१३ या कायद्यानुसार १८ वर्षाखालील व्यक्ती ( मुलगा किंवा मुलगी) सोबत सेक्स केल्यास तो कायद्याने ‘ बलात्कार’ ठरतो. तसेच मुलांचे संरक्षण आणि लैंगिक गुन्हे कायदा २०१२ (POCSO) तसेच विधीसंघर्षित (मुलांचे संगोपन व संरक्षण) अधिनियम, २०१५ या कायद्यांनुसार बालक म्हणजे ” १८ वर्षाखालील व्यक्ती ” अशीच व्याख्या केली आहे.
१८ वर्षे पूर्ण झाली तरीही तुम्ही व तुमचा जोडीदार सेक्स साठी तयार आहात का हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का? याविषयीचा वेबसाईट वरील लेख जरूर वाचा.
यासाठी लिंक- https://letstalksexuality.com/are-you-ready-for-sex/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा