शिश्नाच्या पुढील भागावरील सैल त्वचा (प्रिप्युस) ही शिश्नमुंडाचे संरक्षण करण्याच्या हेतूनेच तिथे असते. शिश्नमुंडावर खूप संवेदना असतात, ज्यामुळे संभोग सुखावह व आनंदाचा होतो, या संवेदना टिकून राहाव्यात हा याचा हेतू असतो. संभोगाच्या वेळेस ही त्वचा मागे घेता येते वा आपोआप जाऊ ही शकते. तेव्हा ही त्वचा मागे हवी का पुढे हा विषयच नाही. गरजेनूसार ही मागे पुढे होतेच की!
जर ही त्वचा मागे जात नसेल तर मात्र समस्या असू शकते, त्यासाठीही काही मार्ग आहेत, जसे ही त्वचा शस्त्रक्रियेद्वारे काढून शिश्नमुंड उघडे केले जाते या पद्धतीला सुंता असं म्हणतात.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/male-circumcision/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा