Aids topic asked 7 years ago

mi eka muli la sex kel ani tila divas pan gel tiche bal khali kel ani tine jar dusrya mula baro with out proction sexkel tar tila AIDS honar ka?

1 उत्तर
Answer for Aids topic answered 7 years ago

ज्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आलेत किंवा येणार आहेत त्या व्यक्तीला जर एच. आय. व्ही./ एड्सची लागण झालेली नसेल तर संसर्ग होत नाही. परंतु जर त्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे अशा एकाजरी व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आला तर एच. आय. व्ही होण्याचा धोका वाढतो. एखाद्या व्यक्तीकडे पाहून ती एच. आय. व्ही बाधित आहे की नाही हे सांगता येत नाही. समोरच्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे की नाही हे ओळखण्याचा एच. आय. व्ही. टेस्ट व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही. म्हणूनच जास्त व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबध ठेवले तर लैंगिक संबंधातून पसरणारे आजार पसरण्याची शक्यता असते. म्हणूनच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे कधीही चांगले.

एच. आय. व्ही./ एड्सची सविस्तर माहिती खालील लिंकवर दिली आहे.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 1 =