Chinta asked 3 years ago

Mala sex video baghaayala avadtat parantu kadhi sex kela naahi

Sex video roj pahile tar tyaacha masik pali var kahi parinam hoto ka?

Karan maji pali 2 divs agodr yete nehmi . Aani yaveliAjun nahi ali

Plz sanga yabaddal

1 उत्तर
Answer for Chinta answered 3 years ago

पॉर्न पाहण्याचा अन पाळी येण्या न येण्याचा काही संबंध नाही. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्रीबीज बीजकोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंडोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.

काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.

गर्भधारणा नक्की कशी होते? याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/conception/

टेन्शन घेण्याचं कारण नाही. अस जर नेहमी होत नसेल तर पाळी येण्याची वाट पहा व नाहीच आली तर पाळी न येण्याचं कारण शोधणं गरजेचं आहे त्यामुळे स्त्रीरोग तज्ञांना भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 14 =