consultation of teen asked 8 years ago

I ask question near about 8 days ago
I didn’t got answer yet
So please reply me fast

1 उत्तर
Answer for consultation of teen answered 8 years ago

प्रिय सर,
तुमचा प्रश्न आम्हाला मिळाला आणि त्याचं उत्तरही आम्ही १८ तारखेलाच पाठवलं आहे. तुमचा प्रश्न प्रायव्हेट होता त्यामुळे तो वेबसाईट ला दिसणार नाही. तो प्रश्न विचारताना तुम्ही जो ईमेल आय डी वापरला त्या ईमेल वर कृपया उत्तर शोधा, तिथे तुम्हाला सापडेल. हा आत्ताचा तुमचा प्रश्न तुम्ही पब्लिक या प्रकारात विचारला आहे. मी तुमची परवानगी न घेता (प्रश्नाचे स्वरूप लक्षात घेऊन) तुमचा मूळ प्रश्न आणि त्याचे उत्तर परत इथे पेस्ट करत आहे त्याबद्दल क्षमस्व. प्रश्न कर्त्याने किंवा कर्तीने कुठल्याही प्रकारात प्रश्न विचारला तरी त्याची किंवा तिची ओळख आम्हाला किंवा वाचकांना उघड होत नाही. तुम्हाला विनंती आहे कृपया उत्तर मिळाले की आम्हाला तसे कळवा, म्हणजे आम्ही निर्धास्त होऊ.त्यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही tathapi@gmail.com या ईमेल वर अथवा ९८५०८५१४९९ वर आमच्याशी संपर्क करा.
धन्यवाद…
 
तुमचा प्रश्न होता –   
मी एक शिक्षक आहे माझ्या मते विद्यार्थी आता मोठे होउ लागले आहे त्यांच्या व्यवहारात बदल होत आहे या वयात आल्यावर त्यांच्या मनात अनेक लैंगिक प्रश्न व अन्य प्रश्न निर्माण हॉट असतील विशेषतः मुलींनी कोणती काळजी घ्यावी इत्यादीं संबंधी त्यांचे मार्गदर्शन करावे लागेल
विशेषतः शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम ऎसे ते या वयात समजतात
तर त्याना या विषयी कश्या प्रकारचे मार्गदर्शन करावे यासम्बन्धी एखादा लेख कृपया मला लवकरात लवकर पाठवावा ही विनंती
 
त्याचे उत्तर –
अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रश्न तुम्ही विचाराला आहे. हा खरं तर सर्वांनाच विशेषतः शिक्षक आणि पालकांना जाणवणारा आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पण तुमच्यासारखे खूप कमी तो विचारण्याचा किंवा त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात. प्रथम तुमचे त्याबद्दल अभिनंदन..
खरं तर प्रत्येक मुलासाठी, मुलीसाठी हे वाढत्या वयातील खूप अवघड पण महत्वाचं वळण असतं. निसर्ग नियमानुसार शरीरात आणि मनात खूप उलथापालथी होत असतात. अनेक प्रक्रिया घडतात, नवनव्या संवेदना निर्माण होतात. माहिती आणि संवादाअभावी त्यांचा अर्थ कसा लावावा, त्यांना कसा प्रतिसाद द्यावा हे बहुतेक वेळेस समजत नाही. माहिती मिळालीच तर ती शास्त्रीय, अचूक आणि योग्य असतेच असे नाही, नव्हे बहुतक वेळेस ती चुकीची, अर्धवट आणि पूर्वगृहदुषित असण्याची श्यक्यताच अधिक. मग मुलांचा गोंधळ उडतो, निराश व्हायला होतं किंवा कधी कधी स्वतःला किंवा इतरांना दुखावणारं वर्तन होण्याची श्यक्यता असते. मुलांच्या सुरक्षिततेलाही धोका उत्पन्न होऊ शकतो.
अशा काळात योग्य माहिती, संवेदनशील पद्धतीने आणि मोकळेपणाने साधला गेलेला संवाद मुलांना आत्मविश्वास तर देतोच परंतू स्वतःप्रती आणि इतरांप्रतीही जबाबदारीचं भान देतो असा आमचा अनुभव आहे. आपल्या शरीराशी ओळख, मैत्री असेल, वाढत्या वयात होणाऱ्या बदलांची माहित असेल, त्यांचे अर्थ समजतील आणि त्या बदलांना कसं सामोरं जायचं याची कल्पना असेल तर मुलं नक्कीच अधिक सुजाण आणि जबाबदार होतील.
तथापि ट्रस्ट गेली १५ वर्षेहून अधिक काळ शरीर साक्षरता या विषयात काम करते आहे. या वयोगटातील मुलांसोबत तसेच त्यांच्या पालक-शिक्षकांसोबत संवाद साधत त्यांना उपयोगी अनेक संसाधनांची निर्मिती केली आहे त्यांचा प्रसार केला आहे. ‘शरीर साक्षरता मुलांसाठी’ हा तीन कार्यपुस्तकांचा संच हे त्यातीलच एक उदाहरण. तथापिकडे हा संच १८० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तथापि सारख्या काही इतरही संस्था-व्यक्ती महाराष्ट्रात आहेत जे या क्षेत्रात भरीव काम करत आहेत. तथापिच्या वेबसाईट वर या संसाधनाची माहिती आहे. अथवा आपण आम्हाला tathapi@gmail.com वर संपर्क साधलात तर आम्ही अधिक माहिती आपणापर्यंत पोचवू शकू.
खाली एक लिंक देत आहोत ज्यावर तुम्हाला डॉ मोहन देशपांडेंचा एक लेख दिसेल ज्यात विस्ताराने हा विषय चर्चिला आहे.
https://letstalksexuality.com/sexuality-education/
प्रस्तूत लेख संपादित आहे. मूळ लेखासाठी कृपया वरती दिलेल्या ईमेलवर संपर्क करा. तुम्हाला तुमच्या या प्रवासाठी अनेक शुभेच्छा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 10 =