गुदामैथुन करण्यामध्ये गैर काही नाही. जोडीदाराची संमंती असणं खूप महत्वाचं आहे. याव्यतिरिक्त गुदामैथुन करताना नेहमी लक्षात ठेवा, गुदद्वार योनीसारखे लवचिक नसते. त्यामुळं गुदामैथुन करताना दोघानांही जास्त त्रास होवू शकतो. यासाठी चांगल्याप्रकारची वंगणं वापरणं फायदेशीर ठरतं. थुंकीदेखील एक प्रकारचं वंगण आहे. गुदामैथुन करताना शक्यतो निरोधचा वापर करावा.
योनी किंवा लिंग चाटणे याला मुखमैथुन असंही म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर वैद्यकीय उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये, किंवा ते करताना लॅटेक्स शीट मिळतात त्याचा किंवा कोणत्याही तलम कापडाचा वापर करा
वरील प्रकारच्या लैंगिक क्रियांमध्ये स्वच्छता असणं फार महत्वाचं आहे. अन्यथ जोडीदाराला त्याची किळस निर्माण होवू शकते. कोणत्याही लैंगिक कृती करण्यासाठी जोडीदाराची समंती असणं आवश्यक आहे. या किंवा अशा कोणत्याही लैंगिक क्रिया करताना त्यांच्या सुखकारक परिणांमांसाठी जोडीदाराशी मोकळा संवाद हवा. संवादाची सुरुवात तुम्ही केली तर जोडीदार त्याला प्रतिसाद देवू शकेल.
https://letstalksexuality.com/dental-dam/
https://letstalksexuality.com/category/faq/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा