काही स्त्रियांच्या योनीच्या आतल्या बाजूला जास्त संवेदनशीलता देणारा भाग असू शकतो. योनीच्या तुलनेत या भागाला लिंग-योनीमैथुन करताना लिंगाचं घर्षण झाल्याने जास्त सुख मिळतं. या भागाला \’जी स्पॉट\’ म्हणतात. असं भाग काही स्त्रियांमध्येच आढळला आहे. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना आणि लैंगिक सुख मिळू शकतं. याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/clitoris/ https://letstalksexuality.com/clitoris-and-orgasm-in-women/
2 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा