क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?

स्त्रियांमध्ये  क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्येही बहुतेक वेळा तो दाखवलेला नसतो आणि दाखवला असेलच तर एक छोटासा उंचवटा म्हणून दाखवलेला असतो. ग्रामीण भागात याला दाणा, टिटनी किंवा बटण म्हणलं जातं. पण या सगळ्याचा अर्थ संवेदनशील टोक इतकाच आहे. प्रत्यक्षात मात्र क्लिटोरिस संपूर्ण मायांगामध्ये पसरलेलं आहे.

जगातील पहिले शरीरशास्रानुसार अधिक योग्य, प्रिंट करता येईल असे 3D क्लिटॉरिस वरील चित्रामध्ये दिले आहे. फ्रेंचमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यासाठी वापरले जाणार आहे. या क्लिटोरिस प्रतिकृतीचा वापर करून मुलांना शाळेमध्ये शिकवले जाईल की, पुरुषाचे लिंग ज्या पेशींपासून बनलेले असते त्याच पेशींपासून क्लिटोरिस बनलेले असते. फरक इतकाच आहे की, महिलांच्या या पेशी शरीराच्या आत असतात आणि बऱ्याचदा त्या पुरुषांपेक्षा लांब म्हणजेच जवळजवळ ८ इंच असतात.

लैंगिक सुखाचा विचार करता स्त्रीमध्ये योनीमार्गापेक्षा क्लिटोरिस खूप महत्वाची भूमिका बजावते.   स्त्रियांनादेखील पुरुषांसारखी ताठरता येणारी, उद्दीपित होणारी (erectile system) रचना असते. लैंगिक सुख ही काही जादू नाही की, ते फक्त स्त्रीला फक्त पुरुषांकडूनच मिळू शकते.

हळुवार दाबलं, चोळलं, स्पर्श केला किंवा सायकल चालवण्यासारख्या कृतीमध्ये क्लिटोरिस उद्दीपित होऊ शकतं. लैंगिक संभोगामध्येही ते उद्दीपित होऊ शकतं. असं झाल्यावर लैंगिक संवेदना सर्वोच्च बिंदू गाठतात आणि ऑरगॅझमचा अनुभव येतो. उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून क्लिटोरिस फुलतं, आकुंचन पावतं आणि शिथिल होतं. लैंगिक सुख देणं हेच याचं एकमेव कार्य आहे. प्रजननामध्ये त्याची कोणतीही स्पष्ट किंवा प्रत्यक्ष भूमिका नसते.

योनीमध्ये लघवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग हाताला लागेल. त्याला स्पर्श करून पहा. काय संवेदना जाणवतात? लैंगिक संवेदना निर्माण होतात का? लैंगिक भावना निर्माण झाल्यावर क्लिटोरिसला स्पर्श करून लैंगिक सुखाचा अनुभव घेता येतो. स्त्रिया किंवा मुली हस्तमैथुन करताना क्लिटोरिसला स्पर्श करून सुख मिळवू शकतात.

संदर्भ:  https://www.theguardian.com/education/2016/aug/15/french-schools-3d-model-clitoris-sex-education

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap