mala mule far aavadatat sex karanyasati pan maze lagin zale aahe mala yek mulaga aahe mala purashanchy linga badal far aatraction aahe tyamule far probl yet aahet mi kai karu
तुमच्या प्रश्नावरून तुम्ही पुरुष आहात, स्त्री नाही आहात असे समजून मी हे उत्तर लिहित आहे. कृपया तसे नसेल तर सांगा. परत प्रश्न पाठवा.
तुम्हाला जे वाटते त्यात काहीही गैर किंवा अनैसर्गिक नाही. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तुम्हाला तुमच्या लिंगाच्या व्यक्तींबद्दल आकर्षण वाटते आहे. त्याला समलिंगी आकर्षण असे म्हणता येईल. तुमची आत्ताची कौटुंबिक स्थिती पाहता मी तुम्हाला योग्य व्यक्तीकडून प्रत्यक्ष सल्ला घेण्याबद्दल सुचवेन. पुण्यात समपथिक नावाची संस्था आहे जिथे बिंदू माधव खिरे काम करतात. त्यांना किंवा तुमच्या जवळच्या समलैंगिकता या विषयावर काम करणाऱ्या संस्थेत आपण संपर्क करा. किंवा तुमच्या माहितीतील चांगल्या समुपदेशकाला भेटा. चांगल्या याचा अर्थ समलैंगिकता हा विषय समजणाऱ्या. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जे काही प्रोब्लेम तुम्हाला येत आहेत ते अशा तज्ञ व्यक्तींच्या मदतीने सुटू शकतात. तेंव्हा मदत घ्या.
मुले आवडतात असे जे तुम्ही म्हटले आहे त्या बद्दल. तुम्हाला कल्पना असेलच की १८ वर्षे वयाखालील मुलांशी लैंगिक संबंध ठेवणे किंवा लैंगिक वर्तन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा आहे..
तुम्ही आधी ही प्रश्न विचारला आहे का? अशाच एका प्रश्नाला आम्ही अगोदरच एक उत्तर दिले आहे. त्याची लिंकही खाली देत आहोत.
https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/