सेक्स झाल्यानंतर मासिक पाळी येऊन गेली असेल तर गर्भधारणा होण्याचा प्रश्नच नाही.
मासिक पाळी चुकण्याचे गर्भधारणा हे एक कारण आहे आहे. इतरही काही कारणांमुळे मासिक पाळी लांबू शकते. या महिन्यामध्ये जर मासिक पाळी नसेल आली तर त्यामागे इतर कोणते कारण आहे का? हे बघा. कधीकधी काही शारीरिक अडचणी(थकवा), मानसिक ताणतणाव, यांसारख्या कारणांमुळेही मासिक पाळी मागे- पुढे होऊ शकते. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा योग्य पर्याय आहे.
गर्भधारणा नक्की कशी होते याविषयी अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.