mi roj hastmaithun karto tyane majya bhavi ayushyat kahi farak padel ka maje ajun lagn jhale nahi mahe age 30 ahe.
हस्तमैथुन केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत मिळेल. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो हे लक्षात घेऊ यात. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे. ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/ प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) :- https://letstalksexuality.com/question/