प्रश्नोत्तरेhastmethun kelya mule pimpals udhtat ka

1 उत्तर

हस्तमैथुनाचा आणि चेहऱ्यावर पिम्पल्स येणे याचा काहीही संबंध नाही. वाढत्या वयात शरीरामध्ये काही बदल होत असतात. यामध्ये चेहरयावर पिम्पल्स येणे हा एक बदल होतो. वाढत्या वयाबरोबर शरीरामध्ये तयार honaryहोत असलेल्या अतिरिक्त हार्मोन्सचा (संप्रेरके) पिम्पल्सशी संबंध आहे.   हस्तमैथुन केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’  तसेच प्रश्नोत्तरे  (बिनधास्त वाचा…) जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/ प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 4 =