एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुद मैथुन) लागण होऊ शकते. एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया, दूषित रक्त आणि प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.
वरीलपैकी कोणतेही कारण घडल्यास एच. आय.व्ही होऊ शकतो. एचआयव्हीची आधीची लक्षणं साध्या सर्दी-तापासारखी असतात. ताप, अंगदुखी, खोकला, इत्यादी. असुरक्षित संभोगानंतर 3 ते 6 आठवड्याच्या आत पुढील लक्षणं जाणवू लागली तर एचआयव्ही तपासणी करणं गरजेचं आहे.
ताप, डोकेदुखी
जुलाब
अंगावर रॅश, पुरळ
एचआयव्हीची लागण नसेल तर ही लक्षणं कसल्याही उपचराशिवाय जाऊ शकतात. मात्र लागण झाली असेल तर ही लक्षणं कित्येक महिने तशीच राहतात. आणि हळूहळू शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट करतात. यातूनच पुढे एड्स ही अवस्था येते.
याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.