प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsgudhmargani vina kondam sex kelay hiv hou sakto ka ?

Mi don mulashi sex kela aahe tar mi pan mulga aahe pan ekdach sex kelay gudhmargani vina kondam hiv hou sakto ka

sujay replied 8 years ago

blood test madhun hiv aahe ki nahi samju shakte kay ka hiv chi test vegli karavi lagte

I सोच replied 8 years ago

एड्स आहे की नाही, हे रक्ताच्या चाचणीतून कळू शकेल. एलायझा या चाचणीची किंमत कमी असल्याने मुख्यतः याच चाचणीचा वापर केला जातो. या चाचणीची मर्यादा अशी की, एच. आय. व्ही झाल्यावर तीन महिन्याच्या आत ही चाचणी केली, तर ती बिनचूक उत्तरं देईलच असं नाही. म्हणूनच या तीन महिन्यांना ‘गवाक्ष काळ’ (विंडो पिरिअड) म्हणतात. म्हणून ही चाचणी आणखी तीन महिन्यांनी पुन्हा एकदा करावी लागते. जर चाचणी दोन्ही वेळा निगेटिव्ह आली तर चिंता करण्याचे कारण नाही.

1 उत्तर
Answer for hiv answered 8 years ago

ज्या व्यक्तींसोबत तुमचे लैंगिक संबंध आले आहेत त्यांना जर एच. आय. व्ही. नसेल तर तुम्हाला संसर्ग होणार नाही. मात्र ज्या व्यक्तींसोबत तुमचे लैंगिक संबंध आले आहेत त्यांना जर एच. आय. व्ही. असेल तर तुमचे त्यांच्यासोबत असुरक्षित (विना कंडोम ) लैंगिक संबंध आले असल्याने  एच. आय. व्ही. चा संसर्ग होऊ शकतो. समलिंगी असो किंवा विषमलिंगी कोणतेही जोखमीचे लैंगिक वर्तन एच. आय. व्ही.  संसर्गाचा धोका वाढवते. गुदमैथुनामुळे एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो कारण त्यामध्ये जखमा होण्याची शक्यता असते. जखमांमुळे एच. आय.व्ही. विषाणूंचा प्रवेश अधिक सहजतेने  होतो. म्हणून योनी मैथुनाच्या तुलनेत गुदमैथुन अधिक धोकादायक आहे. एच. आय. व्ही. आणि एड्स विषयी अधिक  माहितीसाठी यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि वाचा.

एच आय व्ही – एड्स

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 8 =