Indian sex asked 8 years ago

Indian sex बघण्यासाठी website sanga

Anil kate replied 8 years ago

स्री गर्भधारण राहिल्यावर सेक्स कोणत्या महिन्यापर्यँत करावा

I सोच replied 8 years ago

दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. वास्तवात गर्भ धारणा झाली आहे हे बहुतेक वेळेस दुसऱ्या महिन्यात लक्षात येते. त्यामुळे गरोदरपणाच्या अगदी प्राथमिक टप्प्यात शरीर संबंध आलेले असण्याची शक्यता असतेच. पूर्वी जर एकापेक्षा अधिक गर्भपात झाले असतील किंवा तशी काही हिस्ट्री असेल तर डॉक्टर बरेचदा पहिल्या काही महिन्यात शरीर संबंध टाळण्याचा सल्ला देतात. नंतरच्या काळात म्हणजे गरोदरपणाच्या तिसऱ्या टप्प्यात किंवा शेवटच्या तीन महिन्यात पोटाचा वाढलेला घेर कदाचित अडथळा ठरू शकतो किंवा ओटीपोटावर जोर किंवा दाब पडण्याची शक्यता असते. या परिस्थितीत अन्य एखाद्या पोझिशनचा विचार करता येईल उदा. शरीर संबंधांच्या वेळी स्त्री जोडीदार वरती असेल. गरोदरपणात गर्भाशयाचे तोंड उघडणे किंवा रक्तस्त्राव (स्पॉटिंग) होणे गंभीर असते. अशी शक्यता वाटत असेल तर तुम्हाला शरीर संबंध टाळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. जर जोडीदाराला लिंग संसर्ग झालेला असेल तर तो पूर्ण बरा होइपर्यंत संबंध न येऊ देणं गरजेचंच आहे. ह्या आणि अशा काही परिस्थिती सोडल्या तर शरीर संबंधांवर इतर कुठलीही बंधनं आणण्याची गरज नाही. शरीर संबंधांचा गर्भावर कसलाही परिणाम होत नाही.

1 उत्तर
Answer for Indian sex answered 8 years ago

ही वेबसाइट लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा व्हावा म्हणून तयार करण्यात आली आहे. लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं समजावीत हा या वेबसाइटचा उद्देश आहे. आपली ही वेबसाईट कोणतेही उत्पादन किंवा प्रोनोग्राफी दाखवणारया वेबसाईट सुचवित नाही अथवा त्याचा प्रचार आणि प्रसार करत नाही. प्रोनोग्रफी हा विषय आपण आपल्या प्रश्नोत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. याविषयावर अनेक लोकांची मतमतांतरे आहेत. काही दिवसांपूर्वी आपण वेबसाईटवर एक लेख देखील प्रकाशित केला होता त्याची लिंक तुम्हाला पाठवत आहे. तुमच्या आवांतर वाचनाचा भाग म्हणून हा लेख नक्की वाचा. तसेच वेबसाईटवरील इतर लेख नक्की वाचा व तुमचे इतर काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा.
https://letstalksexuality.com/pornography-feminist-critique/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 7 =