प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजात- समाजाला लागलेली एक कीड

mi eka mulivr prem krto tichi caste (obc) ahe
v mi (ntc) ahe..

amche ek mekanvr khup prem ahe
fakt madhat yete ti-JAAT

mla majhe prem abadhit thevayche ahe.
mi kay kru
jyamule tichya gharchyyanna pn hya premachi kdr yeil v jatiy bndne todun आंतरजातीय विवाहास protsahn detil

1 उत्तर

तुम्ही एक फार महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला आहेत. जातीचं बंधन न पाळता तुम्ही एकमेकांवर प्रेम करत आहात त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचं खूप कौतुक करायला पाहिजे. स्वतंत्र भारतात आजही जात पाळली जाते हा फार मोठा अन्याय आहे. जातीचं निर्मूलन करायचं असेल तर आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजेत, जात व्यवस्था मोडून काढायचा हाहा एक मार्ग असेल असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. आणि ते खरंही आहे. सोपं मात्र नाही.
तुम्हाला घरच्यांच्या संमतीने लग्न करायचं असेल तर तुम्हाला धीराने, हिमतीने घ्यावं लागेल. गेल्या काही काळात वेगळ्या जातीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडल्याबद्दल किंवा लग्न केल्याबद्दल मुलांना आणि खास करून मुलींना मोठ्या प्रमाणावर हिंसेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे घरच्यांचा विरोध असेल तर तो हिंमत ठेऊन आणि चिकाटीने मोडून काढावा लागेल. समाज, शेजारी-पाजारी, नातेवाईक असे अनेक प्रकारचे दबाव आपल्यावर आणि आपल्या पालकांवर असतात. संस्कृती, जातीच्या, घराण्याच्या इज्ज्तीच्या खोट्या कल्पना, बंधनंही असतातच. कधी कधी त्यांची तयारी असली तरी या दबावाला तोंड देण्याचं बळ त्यांच्यामध्ये नसतं. अशा वेळी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं न करता त्यांचा पाठिंबा कसा मिळवता येईल याचा विचार करा. मात्र हा सोपा मार्ग नाही.
कधी कधी हा विरोध इतका तीव्र असतो की तो मावळतच नाही, अशा वेळी तुम्ही काय करणार आहात? हे दोघं मिळून विचार करून ठरवा. मुलींसाठी असा निर्णय घेणं कधी कधी जास्त अवघड असतं. तुमची दोघांची तयारी असेल, मुख्य म्हणजे दोघं सज्ञान असाल, स्वतःच्या पायावर उभे असाल, स्वतंत्र रहायला तयार असाल तर तुम्ही विशेष विवाह कायद्याची मदत घेऊन लग्न करू शकता. याची माहिती तुम्हाला पुढे मिळेल – https://letstalksexuality.com/laws-for-students/
महाराष्ट्रात अशा संस्था-संघटना आहेत ज्या आंतर जातीय आणि आंतर धर्मीय विवाहांसाठी मदत करतात. त्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमचा निर्णय कौतुकास्पद आहे मात्र जे कराल ते विचाराने करा.
ऑल द बेस्ट!

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 0 =