तुमचा रोख कदाचित इमर्जन्सी पिल्सकडं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सहसा नाही असं आहे. एखाद्या वेळी अशी गोळी घेतल्याने कोणताही परिणाम भविष्यातील गर्भाधारणेवर होत नाही. असुरक्षित लैंगिक संबंधांच्या मुळे गर्भधारणा होऊ नये म्हणून अशा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन पिल्स घेतल्या जातात. ह्या गोळ्यांचा परिणाम त्या वेळेपुरताच असतो. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतात म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापरायला हव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा वापर करणं शरीरासाठी चांगलं नाही.
याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.