महिन्यातील सर्वच दिवस गर्भधारणेसाठी पूरक नसतात. गर्भधारणेसाठी अंडोत्सर्जन ही सर्वात महत्वाची प्रक्रिया असते. मासिक पाळीच्या १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जनाची प्रक्रिया घडते. परंतू अंडोत्सर्जन नक्की कोणत्या दिवशी होईल हे सांगणं कठीण असतं. शिवाय केवळ बाह्य लक्षणांवरुन अंडोत्सर्जन झालं आहे हे कळणं कठिण आहे. शिवाय प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळी चक्र वेगवेगळ्या दिवसांचं असतं. कधी आजारपणामुळं किंवा मानसिक तणावामुळं पाळी चक्र मागे-पुढे देखील होतं. जर तुम्हाला सुरक्षित काळ ओळखता आलं तर हे शक्य होवू शकतं मात्र त्यात नेहमीच रिस्क राहतेच.
जर तुम्ही रिस्क घेऊन संभोग करणार असाल तर गर्भधारणेची शक्यता नेहमीच असते. शिवाय़ गर्भधारणेच्या चिंतेमुळं महिलांच मानसिक स्वास्थ बिघडतं. शिवाय गर्भधारणा होवून गर्भपाताची वेळ आली तर मग शरीराची देखील हानी होते. त्यामुळं नेहमी योग्य गर्भनिरोधके वापरणं फायदेशीर राहतं.
गर्भधारणा नक्की कोणत्या काळात होते याबद्दल तुम्हाला माहिती हवी. या माहितीसाठी खालील लेख आवर्जून वाचा.