Masturbation asked 9 years ago

hasthmaithun kelyane ling(शिश्न) vadte ka..

kinva tyane shighrapatan ha problem hou shakto ka

1 उत्तर
Answer for Masturbation answered 9 years ago

सर्वात प्रथम आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की हस्तमैथुनामुळे शिश्नाचा आकार वाढत नाही. आणि मुळात शिश्नाच्या आकाराचा आणि लैंगिक आनंद मिळण्याचा काहीही संबंध नाही त्यामुळे शिश्नाचा आकार वाढवण्याबद्दल जर का तशी आपली काही शंका असेल तर ती मनातून काढून टाका. हस्तमैथूनामुळे शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हस्तमैथून ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो व शिवाय आपण आपल्या स्वतःच्या लैंगिक आवडी-निवडी बद्दल खूप काही जाणून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट ही की हस्तमैथून केल्याने शीघ्रपतन होत नाही. त्यासाठी इतर अनेक कारणे असू शकतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात शारीरिक व मानसिक ताणामुळे, योग्य तशी झोप नं घेतल्याने, चिंतेमुळे शीघ्रपतन होऊ शकते. त्यामुळे आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, लैंगिक सुखाबद्दल असणाऱ्या चिंता, भीती मनातून काढून टाका व हस्तमैथूनाचा आनंद घ्या. 
शीघ्रपतनाविषयी जास्त जाणून घ्यायचं असेल तर पुढील लेख वाचा
https://letstalksexuality.com/premature-ejaculation/                

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 10 =