प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझं लग्न होवून दोन वर्ष झाली मुल का होईना? कधी दोन तर तीन महिने पाळी येत नाही अस का होतं?
1 उत्तर

पाळीचक्र नियमित नसल्याने पाळीचक्रातील अन्डोत्सर्जनाचा काळ आणि गर्भधारणेसाठी पूरक काळ ओळखणं अवघड जातं. पाळीचक्रातील गर्भधारणेसाठी पूरक काळात लैंगिक संबंध आले नाहीत तर गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा नेमकी कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरील लेख नक्की वाचा. https://letstalksexuality.com/conception/.

अनियमित मासिक पाळी व्यतिरिक्तही मुल/गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा न होण्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी आणि उपचारांसाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहील. महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला तुम्ही आणि जोडीदार दोघांनी घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा गर्भधारणा होत नसेल किंवा मुल होत नसेल तर स्त्रीला जबाबदार धरलं जातं, हे चुकीचे आहे. गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष दोघे जबाबदार असतात.

आता वळूयात तुमच्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे. तुमचं मासिक पाळीचक्र पाळी सुरु झाल्यापासूनच अनियमित आहे की अलीकडे काही कारणांमुळे अनियमित झाले आहे हे समजू शकले नाही. मासिक पाळीचे चक्र हे सर्वसाधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे असते. दर महिन्याला पाळी येणे गरजेचे आहे. ती अनियमित होण्याची अनेक कारणं असू शकतात उदा. खूप मानसिक ताण, गरोदरपण, अनेमिया, एखादा आजार किंवा औषधोपचार सुरु असल्यास होऊ शकते. पाळी जर अनियमित असेल तर योग्य त्या स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घेणं योग्य.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 10 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी