प्रश्नोत्तरेmaze lagn houn 3 varsh zale. ahet dr. kade tritment chlu ahe pan bij ad pute nahi namka proble kay ahe sagu skta ka?

1 उत्तर

बीज नेमके का पुढे जात नाही यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि योग्य ते उपचार घेण्यासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 11 =