प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaze ling Lahan ahe tasech shighra patan hote upay sanga
1 उत्तर

तुम्ही तुमच्या लिंगाचा आकार इथे दिला नाही त्यामुळे लहान म्हणजे किती हे कळत नाही. पण प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंगाचा आकार वाढवण्याचा कोणताही उपाय नाही. त्यामुळे जे आहे त्यात काही वावगं नाही. टेन्शन सोडून द्या…
आता शीघ्रपतना विषयी. याला आपण वीर्य लवकर बाहेर येणे असं म्हणूयात थोडा वेळ. शीघ्रपतनाचा अनुभव कोणत्याही वयात येऊ शकतो आणि आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे. बरेचदा त्यामुळे ती व्यक्ती अथवा त्या व्यक्तीचा जोडीदार यांना कामपुर्ती आथवा लैंगिक समाधान मिळण्यात अडथळा वाटतो आणि त्यातून निराशा येते. शीघ्रपतनाची समस्या दूर होऊ शकते.
अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation/. लेखातील माहितीचा नक्की उपयोग होईल. आपला अनुभव जरूर कळवा..

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 8 =