प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMi 25 varshachi aahe aani maz lagan houn 2 varsha zale pn mi pregnant ch nahi rahat aahe mala bal hav aahe tya sathi kay karayla hav mi??

1 उत्तर

टेन्शन घेऊ नका. गर्भधारणा कशी होते ते समजून घ्या. अन्डोत्सर्जन होण्याचा काळ साधारणपणे समजला तरी तुम्ही त्या काळात गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकता.

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे समजून घेऊ यात. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.

गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संबध ठेवूनही अनेक महिने मुल होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संभोग केल्यानेदेखील गर्भधारणा होत नसेल तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/question/

गर्भधारणेत जर काही अडचण असेल, गर्भ राहत नसेल, अबोर्शन होत असेल तर त्यावर आमच्यापेक्षा डॉक्टरच अधिक अधिकारवाणीने बोलू शकतील. पण त्यासाठी तुम्ही दोघांनीही एकत्र जाणे, ज्या तपासण्या सांगितल्या जातील त्या दोघांनी करणे आवश्यक आहे. तेव्हा काळजी करू नका, वेळ घ्या आणि आवश्यक असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या. टेक केअर..

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 6 =