Mi tichya pali chya 4-5 days nantar sex kela hota pn mi i pill 48 hours nanatar dili..ata tila i pill dilya chya 3 divasa pasun blooding hotay ..mag ti preganatahe ka ?? ticha masik pali nanatar 4-5 divasani bina condom sex kela hota ..ti preganat asu shakate ka ??
सेक्स झाल्यानंतर २४ ते २८ तासांच्या आत i pill किंवा तत्सम गोळी घेतली तर गर्भधारणा राहत नाही. तुम्ही गोळी ४८ तासानंतर घेतली असल्याने अशा परिस्थितीत गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. प्रेग्नंसी टेस्ट करायला हवी. पण कृपया असुरक्षित लैंगिक संबंध येऊ देऊ नका. ते अनेक वेळेस अशा भीती आणि तणावाचे कारण ठरतात. मुलींसाठी अधिक. गर्भधारणा जेंव्हा नको असते तेंव्हा विश्वासार्ह गर्भनिरोधन पद्धतीचाच अवलंब करायला हवा. तुम्ही जी पद्धत अवलंबता आहात, ती एक तर पद्धतच नाही आणि त्यात खूप रिस्क आहेत. गर्भधारणा होण्याची आणि लैंगिक आजारांची सुद्धा. आय पिल, अनवाँटेड ७२ सारख्या गोळ्या इमर्जन्सीमध्ये वापरायचे गर्भनिरोधक आहेत. परंतू आजची तरुणाई या गोळ्यांचा सर्रासपणे वापर करत आहे. या गोळ्यांचा मुलींच्या/स्त्रियांच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. त्यांच्या सर्रास वापरातून तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याला अपाय संभवतो. तेंव्हा काळजी घ्या.
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा एक सुरक्षित पर्याय आहे.खाली काही लिंक्स देत आहोत त्या वाचा..
https://letstalksexuality.com/contraception/
पाळी चक्रात गर्भधारणा कोणत्या काळात होऊ शकते? गर्भधारणेसाठी स्त्रीबीज बीजनलिकेत असणं आणि पुरुषबीज तिथपर्यंत जाऊन त्यांचा संयोग होणं आवश्यक असतं. पुढची पाळी येण्याच्या साधारण 12-16 दिवस आधी अंडोत्सर्जन होतं. बीजनलिकेत स्त्री बीज 12 ते 24 तास जिवंत राहतं. या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मात्र हा काळ नेमकेपणाने सांगता येईलच असं नाही. तसंच पुरुषबीजं स्त्रीच्या योनिमार्गात 3 ते 5 दिवस जिवंत राहू शकतात. म्हणून अंडोत्सर्जनाच्या आधी 4 दिवस आणि नंतर 2 दिवस हा काळ जननक्षम मानला जातो. या काळात गर्भधारणा होऊ शकते.
जास्त् रक्तस्राव होत असेल तर कृपया डॉक्टरांना भेटा.