Kal tumcha jo session zal zeal clg madhe te kup ch chan hot i hope te chalu rahil asech maz question as ahe ki muli ne jar nahi mantli tr mulane te kas sahan. Karych and ka kahi. Mulana tya mulich kupch tras hoto tyamadhun mulane kas. Baher yach

1 उत्तर

तुम्ही कार्यशाळेला दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद..! खरतर सगळ्य़ांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही व्यक्तीचा नाहीचा अर्थ नाहीच असतो.(NO means NO) नातं कोणतही असो भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी किंवा पालक यामध्ये जर मालकी हक्काच्या भावनेचा शिरकाव झाला असेल तर अशी नाती weak होत जातात. याउलट समोरच्या जोडीदाराच्या मताचा आदर केला तर अशी नाती घट्ट होण्याकडे जाऊ शकतं. मात्र मर्दानगीच्या संकल्पना आपल्याला खूप limited विचार करायला भाग पाडतात. मर्दानगीच्या संकल्पानांमध्ये समोरील व्यक्तीने नाही म्हणणं म्हणजे पुरुषांच्या इगोला धक्का लावण्यासारखं मानलं जातं. हा पुरुषी ego आपल्याला माणूसपणाच्या कित्येक दूर नेऊन ठेवतो. नात्यांमध्ये एकमेकांना space द्या. काही काळाने दुखाची तीव्रता कमी देखील होत जाते. त्यामुळं स्वतःसाठी पुरेसा वेळ घ्या.

अधिक माहितीसाठी लिंगभाव(जेंडर) म्हणजे नक्की काय? यावर उपलबध असलेली पुस्तके वाचा. तुम्हाला मदत होईल.

https://letstalksexuality.com/category/gender-as-a-system/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 18 =