प्रश्नोत्तरेCategory: Private Questionmulga honyasathi kadi sex karave

1 उत्तर

मुलगा किंवा मुलीचा गर्भ राहणं स्त्री आणि पुरुषांच्या दोघांच्याही मर्जीवर अवलंबून नसतं, हे निसर्गावर अवलंबून असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगाच झाला पाहिजे हा आग्रह पुरुषसत्ताक मानसिकतेतून आला असून गर्भधारणा होण्याआधीच मुलीचा जन्म नाकारणं हा स्त्रियांवरील अन्याय आहे. गर्भधारणेच्या आधी तसेच गर्भधारणेनंतर लिंगनिवड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असं करणाऱ्या व्यक्तींना तसेच डॉक्टरांना कायद्याने शिक्षा होऊ शकते. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक आणि समान स्थान मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दोघांनाही समान संधी आणि दर्जा मिळाला तर दोघांमध्ये काहीही फरक नाही.

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे समजून घेऊ यात. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.

गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संबध ठेवूनही अनेक महिने मुल होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संभोग केल्यानेदेखील गर्भधारणा होत नसेल तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 14 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी