NOFAP challange mahnje kai?

614
A asked 6 months ago

nofap challange mahnje kai? 3 -4 mahine mastrubatiob kele nahi tar aplya shariratil tayar honarya sperm che kai hote??

1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

नो फॅप चॅलेंज हे कुणीतरी मजेमजेत सुरु केलेली गोष्ट आहे. सतत पोर्न पाहण्याची सवय, त्यातून तयार होणारी हस्तमैथुन करण्याची तीव्र आणि अनियंत्रित ओढ आणि त्यातून मनात तयार होणारा अपराध भाव या सर्व ‘समस्यांवर’ उपाय म्हणून हे चॅलेंज सर्वत्र चर्चिले गेले. विशेषतः ऑनलाईन जगतात. यात सलग ९० दिवस पोर्न आणि हस्तमैथुन टाळणं अपेक्षित आहे. हे चॅलेंज घेणाऱ्या अनेकांचं म्हणणं आहे की त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला, मनोबल वाढलं शिवाय ते त्यांच्या सतत पोर्न पाहण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवू शकले इ. अर्थात हे सगळं व्यक्तिपरत्वे बदलेल. यात किती तथ्य आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी काही अभ्यास झाले आहेत का हे माहित नाही.

तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर कदाचित पहिल्या प्रश्नाचेही उत्तर अधिक स्पष्टपणे देईल. मुलग्यांच्या शरीरात म्हणजे अंडकोशात (टेस्टीकल्स) पुरुषबीज तयार होतात आणि त्यांना पोषक स्थिती उपलब्ध करण्यासाठी, प्रवाही बनवण्यासाठी वीर्यकोशात वीर्य तयार होते. पुरूषबीज हे सातत्याने बनत असतात कारण ते गरज असेल तेव्हा पुरेशा संख्येने उपलब्ध असावेत म्हणून. हस्तमैथुन जरी नाही केले तरी पुरुषांना कधी कधी झोपेत वीर्यस्खलनाचा अनुभव येतो. तीन चार महिने हस्तमैथुन नाही केले तरी हे पुरुषबीज तयार होतच राहतात आणि विर्यकोश वर म्हटल्याप्रमाणे रिकामे होते आणि मग परत भरते.

नो फॅप सारख्या गोष्टींची अनावश्यक आणि वेळ वाया घालवणाऱ्या पोर्न ची सवय सोडवण्यात मदत होत असेल तर ट्राय करून पहा. पण नाही जमले तर काही हरकत नाही. मुख्य म्हणजे हस्तमैथुन आपली लैंगिकता सुरक्षितपणे व्यक्त करण्याचा, लैंगिक आनंद मिळवण्याचा नैसर्गिक – सहज असा मार्ग आहे. त्या बद्दल अपराध भाव बाळगणे आणि त्याच्या आहारीही न जाणे यातच खरा अर्थ आहे.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/